मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

विवाहित पुरुषांनी आहारात या 5 गोष्टी घ्यायलाच हव्यात; काही दिवसात दिसतील जबरदस्त परिणाम

विवाहित पुरुषांनी आहारात या 5 गोष्टी घ्यायलाच हव्यात; काही दिवसात दिसतील जबरदस्त परिणाम

लैंगिक आरोग्यासाठी आहारही महत्त्वाचा असतो.

लैंगिक आरोग्यासाठी आहारही महत्त्वाचा असतो.

लैंगिक आरोग्यासाठी आहारही महत्त्वाचा असतो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी लैंगिक आरोग्यावर परिणाम करतात. विवाहित पुरुषांनी (Married men diet) आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश आवर्जून करणे आवश्यक आहे. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढवते आणि या गोष्टींच्या सेवनाने पुरुषांमध्ये स्टॅमिना (Married men sexual Wellness) वाढतो.

तज्ज्ञांच्या मते, प्रोटीनयुक्त गोष्टी खाल्ल्याने आपल्याला फायदा होईल. यामुळे ऊर्जा पातळी कायम राहते. याशिवाय व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि झिंकने समृद्ध पदार्थ खाण्यावर भर द्यायला हवा. जाणून घेऊया हे घटक मिळवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी आहारात घ्यायला हव्या.

केळी (Banana)

केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असते. केळीच्या नियमित सेवनाने पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर होतात. त्यामुळे दररोज एक केळ खाणेही फायदेशीर ठरते.

पालक

पालक सर्वांसाठीच फायदेशीर आहे. विवाहित पुरुषांनी तर पालक नक्की खावे, तुमच्यासाठी ते जास्त फायदेशीर ठरेल. पालकच्या हिरव्या पानांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. याचा चांगला परिणाम तुमच्या कामजीवनावर दिसून येतो.

लसूण

लसणात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6, फॉस्फरस, मँगनीज, झिंक, कॅल्शियम आणि लोह असते. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण वाढते. टेस्टोस्टेरॉन संप्रेरक वाढवण्यासाठी देखील लसूण उपयुक्त आहे.

हे वाचा - Health Tips : Vitamin B6 शरीराला यासाठी आहे गरजेचं; कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल

मनुका

विवाहित पुरुषांनी मनुका खाणे खूप फायदेशीर आहे. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढते आणि पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर होतात. मध आणि मनुका यांचे सेवन करा, याचा विशेष फायदा होईल.

कोरड्या खजूर (खारीक)

खारीक खाल्ल्याने पुरुषांचा स्टॅमिना वाढतो. खारकांमध्ये अमिनो अॅसिड असतात आणि त्याचे सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

हे वाचा - फक्त सुगंधाला भुलू नका; Deodorant खरेदी करताना या गोष्टींची खात्री करा अन् मगच पैसे द्या

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Food, Health, Lifestyle, Sexual health, Sexual wellness