मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भंडाऱ्यात कुलरने घेतला तरुणीचा जीव; घरातील फरशी साफ करताना जागीच मृत्यू

भंडाऱ्यात कुलरने घेतला तरुणीचा जीव; घरातील फरशी साफ करताना जागीच मृत्यू

ही घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. या घटनेत फरशी साफ करत असताना कुलरचा धक्का बसल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे (Girl Dies of Electric Shock).

  निहाल भुरे, प्रतिनिधी  भंडारा 17 जून : मृत्यू कधी कुठे कसा आणि कोणत्या रुपात येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा घरातच आपली रोजची कामं करत असतानाही अशा काही घटना घडतात, ज्या जीवावर बेततात. घरात असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूच अनेकदा यात मृत्यूचं कारण ठरतात. सध्या अशीच एक घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. या घटनेत फरशी साफ करत असताना कुलरचा धक्का बसल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे (Girl Dies of Electric Shock). भंडारा: स्वतःच्याच दारूच्या व्यसनाला कंटाळला तरूण; उचललं धक्कादायक पाऊल ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथील आहे. सुचिता धनपाल चौधरी असं घटनेत मृत पावलेल्या तरुणीचं नाव असून तिचं वय अवघं 22 वर्षे होतं. सकाळी ती आपल्या घरात साफसफाईचं काम करत असताना ही घटना घडली. घरात लावलेल्या कुलरजवळची जागा साफ करत असताना तिचा कुलरला स्पर्श झाला. परंतु, या कुलरमध्ये वीज प्रवाहित असल्याने विजेचा जबर धक्का लागून ती खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली. 19 वर्ष लेकीला सांभाळलं अन् आईने गळा दाबून संपवलं, आत्महत्येचा बनाव केला पण... सुचिता कोसळल्याचं कळताच घरात एकच गोंधळ उडाला. यानंतर लगेचच तिला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लाखांदूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bhandara Gondiya, Shock

  पुढील बातम्या