Home /News /maharashtra /

प्रियकराला कंटाळून मुलीची आत्महत्या; धर्म परिवर्तनासाठी करत होता बळजबरी

प्रियकराला कंटाळून मुलीची आत्महत्या; धर्म परिवर्तनासाठी करत होता बळजबरी

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

धर्म परिवर्तन करण्यासाठी बळजबरी करून त्रास देत होता प्रियकर....

    अहमदनगर, 29 नोव्हेंबर: पुण्यातील प्रियकराच्या त्रासाला कंटाळून नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रियकर मुलीला धर्म परिवर्तनासाठी बळजबरी करत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यामुळे मुलीनं राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. सोहेल शेख, (रा. वारजे, माळवाडी पुणे) असं आरोपीचं नाव आहे. हेही वाचा... नोकरीचं आमिष दाखवून भाजी विक्रेत्यानं 2 मुलींना ढकललं वेश्या व्यवसायाच्या दलदलीत काय आहे प्रकरण? आरोपी सोहेल शेख याच्या त्रासाला कंटाळून मुलीनं 25 नोव्हेंबरला दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत मुलीच्या आईनं फिर्याद दिल्यावरून आरोपी सोहेल शेख याच्याविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, मृत मुलगी ही दीड वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत पुण्यातील वारजे माळवाडी येथे नातेवाईक यांच्याकडे गेली होती. तिथे आरोपी सोहेलसोबत मुलीची ओळख झाली. आरोपी शेख याने मुलीला वारंवार फोन करून तिच्याशी प्रेमसंबंध तयार केले. तेव्हापासून शेख व सदर मुलगी एकमेकांच्या संपर्कात होते. हेही वाचा...अकाउंटमध्ये पैसे टाक, नाहीतर सेक्स व्हिडिओ व्हायरल करतो; विद्यार्थ्याला धमकी दरम्यान, फेब्रुवारी व मार्च महिन्यात सोहेल शेख यानं मुलीच्या वडिलांना फोन केला होता. एवढंच नाही तर मुलीचे त्याच्यासोबत काढलेला काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. नंतर सोहेल शेख हा मुलीला वारंवार फोन करून त्रास देत होता. तिला धर्म परिवर्तन करण्यासाठी बळजबरी करून त्रास दिला. याचा जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचं मुलीच्या आईनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हणलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या