कोरोनाच्या संशयानं केला प्रेमाचा शेवट; वॉर्ड बॉयकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या

कोरोनाच्या संशयानं केला प्रेमाचा शेवट; वॉर्ड बॉयकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या

प्रेयसीमुळे आपल्यालाही कोरोना झाला असा संशय या वॉर्डबॉयला आला आणि त्याने प्रेमाचा शेवट केला.

  • Share this:

रोम, 03 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार पसरला आहे. आतार्यंत 1 कोटी 15 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 53 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होण्याची भीती आता लोकांच्या मनात इतकी बसली आहे की त्यामुळे एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळत आहे. याच भीतीनं वॉर्ड बॉयनं आपल्या डॉक्टर असलेल्या प्रेयसीची हत्या केली आहे. प्रेयसीमुळे आपल्यालाही कोरोना झाला असा संशय या वॉर्डबॉयला आला आणि त्याने प्रेमाचा शेवट केला.

ही संपूर्ण घटना दक्षिण इटलीमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. मेसिना इथे वॉर्डबॉय आणि त्याची प्रेयसी काम करत होते. इटलीमध्ये कोरोना संसर्ग वेगानं वाढत आहे. त्यानंतर या दोघांनाही कोरोनाच्या रुग्णांची देखभाल करावी लागत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातील एका व्यक्तीनं पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत वॉर्ड बॉयनं स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं दाखल केलं.

हे वाचा-मोदींच्या सूचनेनंतर लॉकडाऊन संपवण्यासाठी तयारी, समोर आला 4 आठवड्यांचा नवा प्लॅन

प्रेयसीमुळे मला कोरोना झाला असं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे तिला शिक्षा देण्यासाठी मी तिची हत्या केली असंही वॉर्डबॉयनं पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांची तपासणी केली असता टेस्टचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. वॉर्डबॉयनं सांगितलेल्या या कथेवर आता पोलिसांचा विश्वास उडाला असून ते आणखी कसून चौकशी या प्रकरणी करत आहेत.

इटलीमध्ये आतापर्यंत 13 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या सतत वाढत आहे. आता पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे यांनी लॉकडाऊन12 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 13,915 लोकांचा मृत्यू तर 115,242 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

हे वाचा-Lockdown च्या काळात किचनमधील हे पदार्थ वाढवतील तुमची इम्युनिटी!

First published: April 3, 2020, 2:20 PM IST

ताज्या बातम्या