अलव, 9 जुलै : राजस्थानमधील (Rajasthan) अलवर जिल्ह्यातून पुन्हा एकदा बलात्काराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. महिला सुरक्षा, महिला सबलीकरणाच्या बढाया मारणाऱ्या आपल्या देशात दिवसेंदिवस बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. अलवर येथील गावातील एका 19 वर्षांच्या मुलीचं अपहरण (Kidnapping) करून 7 जणांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार (gang rape) केला. या कृत्यानंतर नराधमांनी मुलीला रस्त्याच्या किनाऱ्यावर फेकलं आणि फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ( Kidnaped and gangrape of 19 year old girl by 7 people in 3 different villages )
पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जबाब नोंदविला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगिलं की, 19 वर्षीय मुलीच्या भावाने 5 जुलै रोजी बहीण बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. 4 जुलैच्या रात्री साधारण 11.30 वाजता तिची बहीण घराबाहेर गाय बांधण्यासाठी गेली होती. तेथए अली मोहम्मद, सद्दाम आणि साजिद बसून दारू पित होते. यादरम्यान या तिघांनी मुलीचं तोंड दाबून तिला पळवून नेलं. सुरुवातील तिला ताहिरच्या घरी नेण्यात आलं. तेथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
हे ही वाचा-हायवेशेजारील ढाब्यांमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशातील कॉलगर्ल ताब्यात
यानंतर तिघांनी पीडितेला गाडीत टाकून सांखला गावी घेऊन गेले. तेथे ताहिरचे मित्र उमरदीन आणि मरमेज या दोघांनी पीडितेवर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी 19 वर्षांच्या पीडितेले दिवाकरी गावात घेऊन गेले. येथे कुम्हार आणि अरबान यांनीही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर रात्री उशिरा पीडितेला त्यांना विट भट्टीजवळ सोडून पळ काढला.
घरी परतल्यानंतर पीडितेने कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन तरुणीचं अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केसा. या आधारकावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang Rape, Rajasthan