जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gadchiroli Rain Update : गडचिरोलीत पुराचा हाहाकार, अनेकांच्या घरात पाणी, एकजण वाहून गेला तर गावांचा संपर्क तुटला

Gadchiroli Rain Update : गडचिरोलीत पुराचा हाहाकार, अनेकांच्या घरात पाणी, एकजण वाहून गेला तर गावांचा संपर्क तुटला

Gadchiroli Rain Update : गडचिरोलीत पुराचा हाहाकार, अनेकांच्या घरात पाणी, एकजण वाहून गेला तर गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली (gadchiroli heavy rainfall flood situation) जिल्ह्यातील अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथे रात्री अनेक जणांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने तातडीने त्यांना घराबाहेर पडावे लागले.

  • -MIN READ
  • Last Updated :

गडचिरोली, 12 जुलै : मागच्या दोन दिवसांपासून विदर्भात जोरदार पावसाने (vidarbha heavy rainfall) थैमान घातले आहे. दरम्यान गडचिरोली (gadchiroli rain update) जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली (gadchiroli heavy rainfall flood situation) जिल्ह्यातील अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथे रात्री अनेक जणांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने तातडीने त्यांना घराबाहेर पडावे लागले. नागपेल्ली येथे आपत्ती निवारण दल आणि पोलिसांनी १ महिन्याच्या बाळासह सुमारे ७० जणांना सुरक्षितरित्या स्थलांतरीत केले आहे.

जाहिरात

गडअहेरी पुलाजवळचा रस्ता पुरामुळे तुटल्याने अहेरी - देवलमरी, बोरी-आलापल्ली मार्गावरील दळणवळण वाहतूक बंद झाली होती. सोमवारी (दि. ११) कोरची तालुक्यातील बोरी येथील विशाल उमराव कल्लो (वय १९) या युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. मध्यरात्री नागेपल्ली येथील राममंदिर आणि सेवासदन परिसरातील काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. आपत्ती निवारण दलाने स्थानिक युवकांच्या मदतीने २५ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढून इतर नागरिकांच्या घरी स्थलांतरीत केले.

हे ही वाचा :  एकत्रच लढूया, शरद पवारांनी दिली शिवसेना-काँग्रेसला साद, शिंदे सरकारला देणार टक्कर?

सेंट फ्रांसिस शाळेजवळच्या परिसरात पाणी वाढत असल्याने पोलिसांच्या मदतीने त्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत सुमारे ७० नागरिकांना सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आले आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी नदीवर पुलाचे बांधकाम सुरु आहे. या पुलाच्या समोरील रस्ता पुरामुळे तुटला आहे. अहेरीच्या सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे.

जाहिरात

सर्वाधिक पाऊस अहेरी तालुक्यात

मागील चोवीस तासांत अहेरी तालुक्यात सर्वाधिक 209 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सर्वांत कमी 15 मिलीमीटर पाऊस देसाईगंज तालुक्यात पडला.

हे ही वाचा :  ‘अब सभी को सभी से खतरा हैं’ संजय राऊतांचं सूचक ट्वीट, शिंदेंना टॅग केल्यामुळे खळबळ

नाशिक जिल्ह्यातील साडे तीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावातील संपर्क तुटला आहे. याचबरोबर सप्तश्रृंगी गावात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भाविकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. यामध्ये सहा ते सात भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकमध्ये अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने  प्रशासनाशी संपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात