महाराष्ट्रात सध्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. (Heavy Rain in Maharashtra) त्याच बरोबर गुजरातमध्येही मुसळधार पाऊस होत आहे. (Heary Rain in Gujrat) या मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल 61 जणांचा मृत्यू (61 Animal died in Gujrat) झाल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये झालेल्या पावसाचे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचे फोटो. (Gujrat Heavy Rain Photos)
|
1/ 5
गुजरात राज्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. याठिकाणी काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कार पाण्याखाली गेल्याचे फोटोत दिसत आहे.
2/ 5
गुजरातमधील या मुसळधार पावसाचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. यामुळे अनेक जण बेघर झाल्याची परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे.
3/ 5
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या या पूरपरिस्थितीची पूरपरिस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे, अशी माहिती गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
4/ 5
दक्षिण गुजरातमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सखल भाग जलमय झाले. गुजरातेतील नवसारी आणि वलसाड या जिल्ह्यांतील 700पेक्षा अधिक जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
5/ 5
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या या पूरपरिस्थितीनतंर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम तैनात झाल्या आहेत. पूरपरिस्थिती ठिकाणी असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.