मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /"आमच्यात असं काही झालंच नाही" वरुण धवनने 'त्या' चर्चांबद्दल सोडलं मौन

"आमच्यात असं काही झालंच नाही" वरुण धवनने 'त्या' चर्चांबद्दल सोडलं मौन

वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलालच्या (Natasha Dalal) साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याबद्दल त्याने स्वत:चा खुलासा केला आहे.

वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलालच्या (Natasha Dalal) साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याबद्दल त्याने स्वत:चा खुलासा केला आहे.

वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलालच्या (Natasha Dalal) साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याबद्दल त्याने स्वत:चा खुलासा केला आहे.

मुंबई, 23 डिसेंबर: गेल्या अनेक वर्षापासून वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) रिलेशनशीपमध्ये आहेत. वरुण आणि नताशा या वर्षाच्या शेवटी लग्न करणार होते अशा चर्चा रंगल्या होत्या. पण कोरोनामुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मागच्याच आठवड्यात त्यांचा सारखपुडा झाल्याच्या बातम्याही आल्या. पण यावर वरुण धवनने स्पष्टीकरण दिलं आहे. वरुण धवन म्हणाला, 'असं काही घडलेलं नाही. साखरपुड्याचा समारंभ झालेला नाही.' वरुणच्या या स्पष्टीकरणामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाला वरुण धवन?

साखरपुड्याच्या चर्चांबद्दल वरुण धवन म्हणतो, ‘माझा साखरपुडा झालेला नाही. हे खरं आहे की गेली काही वर्ष मी आणि नताशा रिलेशनमध्ये आहोत. त्यामुळे आमच्या नात्याबद्दल चाहत्यांना वेगवेगळे प्रश्न पडतात. पण साखरपुड्याचा वगैरे कोणताही समारंभ झालेला नाही. सध्यातरी लग्नाचा अजिबात विचार करत नाही सध्या माझं सगळं लक्ष माझ्या कामावर आहे’ अशी प्रतिक्रिया वरुण धवनने दिली आहे. वरुण धवन पुढे मस्करीमध्ये म्हणाला, ‘खरतर गेले 20 दिवस मी माझ्यासोबतच रिलेशनशीपमध्ये कारण मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतलं आहे’ शूटिंगदरम्यान वरुण धवन आणि त्याच्या टीमला कोरोनाची बाधा झाली होती.

वरुण धवन आणि सारा अली खानचा 'कुली नंबर 1' हा सिनेमा 25 डिसेंबरला रीलिज होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. कोरोनामधून पूर्णपणे बरा झाल्यानंतर वरुण धवन 'जुग जुग जिओ' या चित्रपटाचं शूटिंग पुन्हा सुरू करणर आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा अडवाणी आणि अनिल कपूर, नीतू कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Varun Dhawan