• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • दिलासा नाहीच! राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली मात्र मृत्यूदरात वाढ

दिलासा नाहीच! राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली मात्र मृत्यूदरात वाढ

मागील चोवीस तासांचा विचार केल्यास राज्यात तब्बल 200 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर सध्या 2.03 टक्के इतका आहे.

 • Share this:
  मुंबई 10 जुलै : देशभरात मागील एका वर्षाहून अधिक काळापासून कोरोनानं (Coronavirus in India) थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंही (2nd Wave of Coronavirus) काही दिवसांपूर्वी हाहाकार माजवला होता. विशेषतः महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या (Corona Cases in Maharashtra) आढळून आली. मात्र, आता दुसरी लाट ओसरताना दिसत असल्यानं नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंधही शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आटोक्यात येताना दिसत नाहीये. अरे देवा! कोरोनापासून सुटका नाहीच; मोदी सरकारने महासाथीबाबत दिली मोठी माहिती मागील चोवीस तासांचा विचार केल्यास राज्यात तब्बल 200 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर सध्या 2.03 टक्के इतका आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 1 लाख 25 हजार 34 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विशेषतः मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक 15 हजार 599 मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूदर वाढता असला तरी रोजची कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या खालीच नोंदवली जात असल्यानं ही काहीशी दिलासादायक बाब आहे. कडकनाथच्या नावानं चांगभलं! रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त असल्याचा दावा मागील 24 तासात राज्यात 8 हजार 992 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 61 लाख 40 हजार ९६८ वर पोहोचली आहे. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 59 लाख 440 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 10 हजार 458 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 231 असून राज्याचा रिकव्हरी रेट 96.08 टक्के इतका आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: