मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तरुणांच्या स्कुटीला विचित्र अपघात, पुलावरून 25 फूट खाली फेकले गेले, दोघे गंभीर

तरुणांच्या स्कुटीला विचित्र अपघात, पुलावरून 25 फूट खाली फेकले गेले, दोघे गंभीर


भिवंडी शहरातील जकात नाका येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर ही घटना घडली. सुसाट वेगात आलेल्या दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने...

भिवंडी शहरातील जकात नाका येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर ही घटना घडली. सुसाट वेगात आलेल्या दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने...

भिवंडी शहरातील जकात नाका येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर ही घटना घडली. सुसाट वेगात आलेल्या दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने...

भिवंडी, 18 ऑगस्ट : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भयंकर अपघात झाल्याची घटना भिवंडीमध्ये (bhiwandi) घडली आहे. भिवंडी शहरातील  राजीव गांधी उड्डाणपुलावरून (rajiv gandhi bridge bhiwandi) भरधाव वेगात जाणाऱ्या तरुणांची दुचाकी 25 फूट खाली पडून दोन तरुण  गंभीर जखमी झाले आहे. जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिवंडी शहरातील जकात नाका येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर ही घटना घडली. सुसाट वेगात आलेल्या दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने दोन तरुण पुलावरून थेट 25 फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहे. शंकर पवार, सादाब शेख, इरफान अंसारी असं जखमी झालेल्या तरुणांची नाव आहे. हे तिघे ठाकूर पाडा इथं वाढदिवसाची पार्टी करून स्कुटी वरून वेगात येत होते. शंकर पवार, सादाब शेख हे दोघे खाली पडले मात्र इरफान अंसारी हा पुला वरतीच पडल्याने तो पळून गेला आहे. हे दोन्ही तरूण खाली पडल्याचे कळाल्यावर त्याच ठिकाणी दहीहंडीचा सराव करणाऱ्या तरुणांनी धाव घेऊन दोघांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (मुंबई-दहिसर प्रवास ठरला अखेरचा, खड्डा पाहून ब्रेक मारताच डंपरची धडक, नंतर चिरडलं, भयानक घटना) धक्कादायक बाब म्हणजे, शहरातील या अगोदर वंजारपट्टी नाका इथं दुचाकीस्वार खाली पडून मृत्युमुखी पडला होता. तर कल्याण रोड वरील स्वर्गीय  बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून एक  तर राजीव गांधी उड्डाणपुलावरून दुचाकी स्वार  पडल्याच्या दोन घटना अशा आतापर्यंत चार घटना  घडल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही उड्डाणपुलाचे कठड्यांची उंची  लहान असल्याने असे चार अपघात घडल्याने यांची उंची वाढवण्याची मागणी नागरिक करीत आहे. अखेर 50 तासांनी नदीत पडलेली पिकअप काढली बाहेर दरम्यान, अहमदगर जिल्ह्यातील संगमेनरमध्ये स्वातंत्र्य दिनी प्रवरा नदीवरील पुलावरून पिकअप व्हॅन कोसळली होती. अखेर 50 तासांनी नदीत पडलेली पिकअप काढण्यात यश आले आहे. पिकअपमध्ये चालकाचा मृतदेह आढळला आहे. पण एक जण मात्र बेपत्ता आहे. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हे पथक संगमनेरमध्ये आलं होतं. स्वातंत्र्य दिनी रात्री 8 च्या सुमारास ही गाडी वाहून गेली होती. 16 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग असताना रेस्क्यू ऑपरेशन केलं. प्रकाश सदावर्ते असं मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. स्थानिक प्रशासन व ठाणे दलाने संयुक्त ऑपरेशन केलं.
First published:

पुढील बातम्या