जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डॉक्टरच्या बनावट सहीने घेतलं 328 कोटींचं कर्ज; जालन्यातील त्या प्रकरणात ED ची एन्ट्री

डॉक्टरच्या बनावट सहीने घेतलं 328 कोटींचं कर्ज; जालन्यातील त्या प्रकरणात ED ची एन्ट्री

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Jalna: जालन्यातील डॉ. संजय राख यांच्या बनावट सह्या (Fake Sign) करून त्यांच्या नावावर तब्बल 328 कोटी रुपयाचं कर्ज घेतल्याचं (take 328 crore loan) धक्कादायक प्रकरणात ईडीने एन्ट्री मारली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 26 ऑक्टोबर: जालन्यातील दीपक हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय राख यांच्या बनावट सह्या (Fake Sign) करून त्यांच्या नावावर तब्बल 328 कोटी रुपयाचं कर्ज घेतल्याचं (take 328 crore loan) धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील केजीएस शुगर इंफ्रा कॉर्पोरेशनने विविध तीन बँकांमधून 2014 साली 328 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाबाबत 2018 साली संबंधित बँकांनी थेट डॉ. राख यांना कर्ज वसुलीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर राख यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत मुख्य आरोपीला अटक देखील केली होती. पण अलीकडेच संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाच ईडीने मागवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. संजय राख हे नाशिक जिल्ह्यातील केजीएस शुगर इंफ्रा कॉर्पोरेशन या खासगी कारखान्यात संचालक होते. हेही वाचा- 23 व्या वर्षी केली 40 रुपयांची चोरी; 42 वर्षांनंतर कोर्टाकडून निर्दोष सुटका संबंधित कारखान्यातील अन्य संचालकांनी 2014 साली कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसिस बँक या तीन बँकेतून तब्बल 328 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. याबाबत कोणतीही माहिती डॉ. संजय राख यांना नव्हती. दरम्यान संबंधित बँकांनी डॉ. राख यांना कर्ज वसुलीबाबत नोटीस पाठवली. नोटीस पाहून डॉ. राख यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींनी डॉ. राख यांच्या बनावट सहीचा वापर केल्याचं बँकेतून मागवलेल्या कागदपत्रावरून दिसून आलं आहे. हेही वाचा- 11 कोटींचा विमा हडपण्यासाठी खुनी खेळ; कोब्राचा दंश घडवून निष्पापाचा घेतला बळी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून संबंधित सहीचा अहवाल मागवला असता, संबंधित सही बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी केजीएस शुगरचे संचालक दिनकर सखाराम बोडखे, प्रल्हाद कराड, गणेश कराड, अनिल मिश्रा, मंजुषा बोडके, चीफ ऑफिसर देवाशिष मंडळ, लेखा परिक्षक महेश कोकाटे यांच्यासह बँकेतील कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने सविस्तर माहिती मागवल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात