Home /News /maharashtra /

शेततळ्यात बुडून 4 भावंडांचा मृत्यू, ऊस कामगार कुटुंबावर शोककळा

शेततळ्यात बुडून 4 भावंडांचा मृत्यू, ऊस कामगार कुटुंबावर शोककळा

शेततळ्यात बुडून चार भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

अहमदनगर, 23 जून: शेततळ्यात बुडून चार भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 7 ते 15 वयोगटातील ही मुले आहेत. अहमदनगरमधील श्रीगोंदा येथील बाबुर्डी गावात मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे हातावर पोट भरणाऱ्या ऊस कामगाराच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावात उत्तर प्रदेशातील काही मजूर या गावातील ऊसाच्या गुऱ्हाळवर कामाला आले आहेत. त्यांची मुले मंगळवारी दुपारी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यामध्ये चार भावांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. मुले तळ्यात पोहण्यासाठी गेली असावीत. तळ्यातील प्लास्टिकच्या कागदामुळे ती घसरून पडली असावीत असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा... पत्नीच्या पेटत्या चितेवर पतीनं घेतली उडी, अवघ्या 3 महिन्यांतच मोडला संसाराचा डाव! पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. या चारही भावडांचे चौघांचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातून बाहेर काढले आहेत.मृत मुलांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या घटनेमुळे बाबुर्डी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, धुळे शहरालगत असलेल्या लळिंग कुरणातील धबधब्या जवळ सेल्फी काढण्याच्या नादात तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी घडली होती. धबधबा समोर फोटो काढत असताना एका तरुणाचा पाय घसरला. त्या पाठोपाठ इतर दोन तरुणही पाण्यात बुडाले. घटना घडल्या नंतर सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरड केल्यावर झालेला  प्रकार समोर आला. यावेळी बचाव कार्यासाठी SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. हेही वाचा...हॉलिवूड निर्मात्याची आत्महत्या, 27व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन या तरुणांना बाहेर न पडता आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होते. या दुर्दैवी दुर्घटनेत शुभम अनिल चव्हाण, शुभम प्रेमराज पाटील आणि रोहीत कोमलसिंग गिरासे या तिघांची नावं आहे. आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. SDRF च्या पथकानं तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.
First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Shrigonda

पुढील बातम्या