मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Vinayak Mete : हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त, एका क्षणात मुलांच्या खांद्यावरील मायेचा हात हरपला...

Vinayak Mete : हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त, एका क्षणात मुलांच्या खांद्यावरील मायेचा हात हरपला...

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.

मुंबई, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी समर्थकांनी केली आहे. दरम्यान, मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी बैठकीची वेळ कोणी बदलली? असा प्रश्न करत संशय व्यक्त केला आहे. तर विनायक मेटे यांच्या आईनेही घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र विनायक मेंटेंच्या मृत्यूमुळे शोकाकूल झाला आहे. त्यांच्या कुटुंबाला याचा जबर धक्का बसला आहे. विनायक मेटे यांना 2 मुलं असून त्यांच्या मुलाचं नाव आशुतोष विनायक मेटे (वय १८), तर मुलीचं नाव आकांक्षा विनायक मेटे (वय २१) आहे. विनायक मेटे यांना दोन भाऊ आहेत. रामहरी तुकाराम मेटे आणि त्र्यंबक तुकाराम मेटे अशी त्यांच्या भावांची नावं आहे.

१९८६ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून विनायक मेटेंनी कामाला सुरुवात केली. १९८७ मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख निवड करण्यात आली होती.

विनायक मेटेंच्या आईकडून घातपाताचा संशय; तर बैठकीची वेळ कोणी बदलली? मराठा नेत्याचा प्रश्न

विनायक मेटेंच्या आईचा आक्रोश

'देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका.., आता काय करू' असा म्हणत विनायक मेटे (Vinayak mete) यांच्या आईंनी आक्रोश केला. मेटेंच्या आईंचा आक्रोश पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आलं. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचं अपघाती निधनामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बीडच्या तुकाई निवासस्थानी विनायक मेटे यांच्या घरी त्यांच्या आईंना आणण्यात आले त्यावेळी आईंनी एकच आक्रोश केला.

First published:
top videos

    Tags: Mumbai pune expressway, Pune, Road accident, Vinayak mete