मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विनायक मेटेंच्या आईकडून घातपाताचा संशय; तर बैठकीची वेळ कोणी बदलली? मराठा नेत्याचा प्रश्न

विनायक मेटेंच्या आईकडून घातपाताचा संशय; तर बैठकीची वेळ कोणी बदलली? मराठा नेत्याचा प्रश्न

Vinayak Mete Accident: विनायक मेटे (vinayak mete) यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

Vinayak Mete Accident: विनायक मेटे (vinayak mete) यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

Vinayak Mete Accident: विनायक मेटे (vinayak mete) यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी समर्थकांनी केली आहे. दरम्यान, मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी बैठकीची वेळ कोणी बदलली? असा प्रश्न करत संशय व्यक्त केला आहे. तर विनायक मेटे यांच्या आईनेही घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

बैठकीची वेळ कोणी बदलली? : दिलीप पाटील

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे रात्रीच बीडवरून मुंबईसाठी निघाले होते. शनिवारी त्यांना मंत्रालयातून दोनदा फोन आले होते. सुरुवातीला रविवारी दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती. सायंकाळी सात वाजता त्यांना फोन करून तातडीने मुंबईला या, बैठक 12 वाजता होणार आहे, असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी केला आहे. मेटे यांनी दोन्ही फोन आलेले तेव्हा मी बीडमध्ये आहे, एवढ्या तातडीने मुंबईला कसा पोहोचेन असे त्या फोनवर पलिकडील व्यक्तीला कळविले होते. मात्र, त्यांच्यावर मुंबईला तातडीने येण्यासाठी दबाव कोणी टाकला, याची चौकशी झाली पाहिजे असे पाटील म्हणाले. याचबरोबर दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती. जर वेळ बदलली नसती तर मेटे सकाळी निघून दुपारपर्यंत मुंबईला पोहोचले असते. दुपारी 12 ची वेळ ठेवल्याने मेटे रात्रीच मुंबईला जाण्यासाठी निघाले. ही वेळ कोणी बदलली असा सवाल त्यांनी केला आहे.

वाचा - विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाक्यावरचा Video समोर, अनेक गोष्टींचा होणार उलगडा

शिवसेनेकडून अपघाती मृत्यूबाबत शंका

याचबरोबर शिवसेनेने देखील मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे. शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.

घातपाताचा संशय..

विनायक मेटे यांचं अपघाती निधनामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बीडच्या तुकाई निवासस्थानी विनायक मेटे यांच्या घरी त्यांच्या आईंना आणण्यात आले त्यावेळी आईंनी एकच आक्रोश केला. देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका..काय माझ्या बाबाने लोक जमवली, घरी 15-17 लोक आली तर कधी हाडतूड केली नाय. कुणाला आम्ही जाऊ नका म्हणालो नाय' असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्यांच्या आईने घातपाताचा संशय व्यक्त केला.

First published:

Tags: Vinayak mete