महाराष्ट्रात पहिल्यांदाच दारू घरपोच देण्याचे आदेश निघाले; या जिल्ह्यात करणार सोय

महाराष्ट्रात पहिल्यांदाच दारू घरपोच देण्याचे आदेश निघाले; या जिल्ह्यात करणार सोय

महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका जिल्ह्याने घरपोच दारू मिळण्याबाबत आदेश काढला आहे.

  • Share this:

मुंबई, 6 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असल्याने केंद्राने लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवला आहे. गेल्या 41 दिवसांपासून बंद असलेल्या दारुच्या दुकानांना खुले करण्यास परवानगी दिल्यानंतर गेल्या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये दारुची होम डिलिव्हरी (Home Delivery) सुरू करण्यात येत आहे. त्यातही महाराष्ट्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राज्यातील रत्नागिरी (Ratnagiri) या जिल्ह्यात घरपोच दारू देण्याची सेवा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. मात्र यासाठी काही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच मद्यपींना घरपोच दारूची सेवा मिळू शकेल. यासाठी मद्यपींना आधी ऑनलाइन फाॅर्म भरावा लागले. त्यानंतर त्यांना घरपोच दारूची सेवा मिळू शकेल. याशिवाय दारूची होम डिलिव्हरी करणाऱ्या वाहनांना अधिकृत पास देण्यात येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सर्व नियम पाळले जातील. रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी हे  आदेश काढले आहे.

राज्यातील प्रतिबंधित क्षेत्रात दारु विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी नकार दर्शवला आहे. अनेक राज्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगितले. काही राज्यांनी दारूच्या किंमतीवर 70 ते 75 टक्के अधिक रक्कम वसुल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका जिल्ह्याने घरपोच दारू मिळण्याबाबत आदेश काढला आहे.  मुंबई, पुण्यातील अनेक मद्यपींकडून अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना रत्नागिरीत मात्र घरपोच दारू मिळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनीच काढले आहेत. कोकणात कोरोनाचा प्रभाव कमी असून येथे कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे.

संबंधित -कोरोनाबाबत मोठा खुलासा करणार होता चीनचा संशोधक; गोळी मारुन केली हत्या

कोरोना आणि उन्हाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रावर आता अवकाळी पावसाचं संकट

First published: May 6, 2020, 8:57 PM IST

ताज्या बातम्या