मुंबई 06 मे: गेली दोन महिने महाराष्ट्रा कोरोनाशी निकराची झुंज देतोय. आता मे महिना आल्याने उन्हाच्या काहिलीपासून राज्याची होरपळ सुरू आहे. हे कमी म्हणून की काय पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पावसाचा इशारा वेध शाळेने दिला आहे. या वातावरण बदलाचा तब्येतीवर तर परिणाम होणारच आहे. मात्र शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे.उष्णतेच्या लाटेनंतर आता पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे. वातावरणातल्या बदलांमुळे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो असं वेधशाळेने म्हटलं आहे. अवकाळी पावसाचा फळबागांना फटका बसणार आहे. 7 ते 10 मे या कालावधीत हिंगोली परभणी, नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली पुणे कोल्हापूर भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच भागात उन्हाचा पारा तापत असून देशातल्या तापणाऱ्या टॉप टेन शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या 5 शहरांचा समावेश आहे.
राज्यातल्या सर्वच भागात आता शेतीची कामं सुरू आहेत. हा आंब्याचा हंगाम असल्याने झाडाला मोठ्या प्रमाणावर आंबा आहे. त्यामुळे या पावसाचा फटका त्याला बसू शकतो. त्याचबरोबर द्राक्ष, संत्रा आणि इत फळ बागांनाही त्याचा फटका बसू शकतो.
हे वाच -
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातल्या दुकानात विरोधीपक्ष नेत्याची धाड
कोरोनामुळे नोकऱ्यांवर गदा, 'या' कंपनीने 1900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
दिलासादायक! 44 पैकी 28 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल