Home /News /videsh /

कोरोनाबाबत मोठा खुलासा करणार होता चीनचा संशोधक; गोळी मारुन केली हत्या

कोरोनाबाबत मोठा खुलासा करणार होता चीनचा संशोधक; गोळी मारुन केली हत्या

हल्लेखोराने डॉक्टराला गोळी मारल्यानंतर स्वत:ही गोळी घालून आत्महत्या केली

    बीजिंग, 6 मे : चीनच्या (China) एका संशोधकावर गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संशोधकाने कोरोना व्हायरससंदर्भात (Coronavirus) मोठा शोध लावला आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांची हत्या झाली. पोलिसांकडून हत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे. हत्या करणाऱ्या व्यक्तीने नंतर स्वत:ही गोळी घालून आत्महत्या केली. चीनच्या त्या संशोधकाचं नाव डॉक्टर बिंग लिऊ सांगितले जात आहे. बिंग लिऊ युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिकल सेंटरमध्ये काम करीत होते. 37 वर्षीय डॉक्टर बिंग लिऊ आपल्या घरी काल एकटेच होते. रॉस टाऊनशिपमधील त्यांच्या घरात शनिवारी दुपारी एक व्यक्ती शिरला. त्या व्यक्तीचे नाव हाओगू सांगितले जात आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार हाओगू डॉक्टर बिंग लिऊ यांच्या घरात शिरले आणि फ्लॅटमध्ये शिरताच गोळ्या चालवायला सुरुवात केली. लिऊ यांना डोकं, मान आणि शरीरावरील विविध भागांवर गोळी लागली आहे. तेथेच डॉक्टर लिऊ यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर हल्लेखोर आपल्या गाडीतून परतला आणि त्याने स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली. लिऊ यांच्या घरातील कोणतीही वस्तू गायब झालेली नाही. त्यांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांना माहीतही नव्हते. लिऊ यांच्या मृत्यूनंतर विद्यापीठातील सहकाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. लिऊ हे कोरोना व्हायरससंदर्भातील एका मोठ्या शोधाच्या अगदी जवळ होते. ते कोरोना संसर्गाच्या सेल्यूलर मेकॅनिजमबाबत (कोरोना व्हायरसचा शरीरातील पेशींवर होणारा परिणाम ) संशोधन करीत होते. लिऊचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल अशी भावना विद्यापीठातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. चिऊ यांनी कम्पुटर सायन्समध्ये पीएचडी केली होती. संबंधित-वाचून व्हाल सुन्न..लेकराच्या डोक्यावरुन अखेरचा हात फिरवायची इच्छा अपूर्णच
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या