मुंबई, 20 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते मुंबईमधील अनेक विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केलं. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो लाईन 2-A आणि मेट्रो लाईन 7 याचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर आज मेट्रोतील पहिल्याच प्रवाशानं त्याचा अनुभव शेअर केला आहे.
काय म्हणाला हा प्रवाशी -
जेव्हा मेट्रो तयार होत होती, तेव्हा सर्वात जास्त मी खुश होतो. तसेच मी एक-एक दिवस मोजत होतो की मला कधी या मेट्रोमध्ये प्रवास करायला मिळणार. कारण माझे ऑफिस हे अंधेरीमध्ये आहे आणि मी मालाडमध्ये राहतो. आणि मालाडवरुन मला अंधेरी यायला दीडतास लागतो. कधी बसमध्ये लटकून यायचो, कधी बाईकवर लिफ्ट घेऊन यायचो. कारण बॉसला कधीच कारणं ऐकून घ्यायची नव्हती. आणि माझ्यासाठी माझा एक-एक दिवसाचा पगार फार महत्त्वाचा आहे. म्हणून याप्रकारच्या प्रवासाने त्रासलो होतो. त्यामुळे मी वाट पाहत होतो की ही कधी सुरू होईल. त्यामुळे आता माझ्यापेक्षा जास्त कुणी आनंदी नसेल, अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली. दरम्यान, काल मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर सर्वात आधी तिकीट याच प्रवाशाने विकत घेतले होते.
#MumbaiMetroOurMetro Our first Civil passenger Mr Yogesh Solanki expressed his happiness on commencement of #Metroline7 & 2A He explains his travel woes till date over the years & how things hv changed for the better,thanks to MMRDA’s MumbaiMetro MMRDA Realises Dreams! pic.twitter.com/sers0MZ64x
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) January 20, 2023
काल मोदींनीही केला मेट्रोतून प्रवास -
मुंबई मेट्रोच्या 2 लाईनचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवास केला. अंधेरीच्या गोदिंवली ते मोगारापाडा असा प्रवास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर रवाना झाले. मुंबई मेट्रोमधून प्रवास करत असताना पंतप्रधानांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधला. आगामी काळात मुंबईचा कायापालट होणार. सगळ्यांसाठी मुंबईत राहणं सोयीचं होईल. मुंबईचे रस्ते सुधारण्यासाठी काम सुरू आहे, हे डबल इंजिन सरकारची प्रतिबद्धता आहे, असं आश्वासन पंतप्रधानांनी मुंबईकरांना दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Metro, Mumbai, Narendra Modi, Pm modi, PM Narendra Modi