मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नांदेडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

नांदेडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 3 गोळ्या झाडल्या. गोळीबाराची ही घटना पूर्व वैमानस्यातून घडली की इतर काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

नांदेड, 12 ऑगस्ट : नांदेडमध्ये (Nanded) भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्षावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रसंगावधान राखत पळ काढल्याने त्याचा जीव बचावला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Caught in CCTV) झाली आहे. नांदेड भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष सोनू कल्याणकर (Sonu Kalyankar)वर हा गोळीबार करण्यात आला आहे.

सोनू कल्याणकर श्रीनगर भागातील आपल्या घराच्या गेटजवळ बसला होता. रात्री 9 च्या सुमारास दुचाकीवर तिघेजण त्याच्या घरासमोर आले. त्यापैकी दोघांनी सोनूवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. प्रसंगावधान राखत सोनू घरामध्ये पळाला त्यामुळे त्याचा जीव वाचला.

अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 3 गोळ्या झाडल्या. गोळीबाराची ही घटना पूर्व वैमानस्यातून घडली की इतर काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशत पसरली आहे.

जालन्यात बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत बारमध्ये लूट

शस्त्रांचा धाक दाखवत बारमध्ये लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात ही घटना घडली असून संपूर्ण घटना ही बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 11 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बदनापूर शहरात असलेल्या विराज बारमध्ये दोन अज्ञात दरोडेखोर शिरले. दोन्ही आरोपींनी आपल्या चेहऱ्यांवर मास्क लावून चेहरे झाकलेले होते. सायंकाळच्या सुमारास दोघेही बारमध्ये शिरले आणि त्यानंतर त्यांनी आपल्याकडील बंदूक आणि चाकू बाहेर काढत लूट केली.

First published:

Tags: Cctv footage, Nanded