मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

LIVE VIDEO: बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत बारमध्ये लूट; पैसे, मोबाइल, दारूच्या बाटल्यांसह आरोपी फरार

LIVE VIDEO: बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत बारमध्ये लूट; पैसे, मोबाइल, दारूच्या बाटल्यांसह आरोपी फरार

दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना बारमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

जालना, 12 ऑगस्ट : शस्त्रांचा धाक दाखवत बारमध्ये लूट (Bar looted on gunpoint) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात (Badnapur City Jalna) ही घटना घडली असून संपूर्ण घटना ही बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 11 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बदनापूर शहरात असलेल्या विराज बारमध्ये दोन अज्ञात दरोडेखोर शिरले. दोन्ही आरोपींनी आपल्या चेहऱ्यांवर मास्क लावून चेहरे झाकलेले होते. सायंकाळच्या सुमारास दोघेही बारमध्ये शिरले आणि त्यानंतर त्यांनी आपल्याकडील बंदूक आणि चाकू बाहेर काढत लूट केली.

1 हत्या, 2 आरोपी, 170 CCTV कॅमेरे, 230 जणांची चौकशी; अखेर असं फुटलं आरोपींचं बिंग

बारमालक शिवाजी अंभोरे याच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, बारमधील गल्ल्यातील रोख रक्कम, 4 ग्राहकांचे मोबाइल फोन, एका पिग्मी एजंटचे पैसै आणि बारमधील दारूच्या बाटल्यांची आरोपींनी लूट केली आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

लुटीची ही घटना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, आरोपी हे बिंधास्तपणे बारमध्ये शिरतात आणि त्यानंतर आपल्याकडी शस्त्रांचा धाक दाखवत अगदी सहजपणे लूट करुन निघूनही जातात. दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

First published:

Tags: Cctv footage, Crime