मराठी बातम्या /बातम्या /nashik /VIDEO: राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात हातसफाईचा प्रयत्न; मनसैनिकांनी हाणून पाडला पाकिटमाराचा डाव

VIDEO: राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात हातसफाईचा प्रयत्न; मनसैनिकांनी हाणून पाडला पाकिटमाराचा डाव

MNS Chief Raj Thackeray on Nashik Tour: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत.

MNS Chief Raj Thackeray on Nashik Tour: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत.

MNS Chief Raj Thackeray on Nashik Tour: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत.

नाशिक, 17 जुलै : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिकच्या दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. राज ठाकरे शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली आहे. याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने चक्क हातसफाई करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय विश्रामगृहातील गर्दीत हातसफाई करण्याचा आरोपीने प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या जागरूक मनसैनिकांनी या व्यक्तीला पकडलं. जागरूक कार्यकर्त्यांनी या चोरट्याचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

राज ठाकरेंचा नाशिक दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे शुक्रवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. तर आज सकाळच्या सुमारास अमित ठाकरे, संदीप देशपांडे आणि मनसेचे इतर पदाधिकारी सुद्धा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आगामी पालिका निवडणूक आणि पक्ष संघटना याबाबत चर्चा करत आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा खूपच महत्त्वाचा मानला जात आहे.

तर अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे सुद्धा राजगड येथील कार्यालयात मनवीसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत. विभागवार ही बैठक घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:
top videos

    Tags: Nashik, Raj thackarey