जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गडचिरोलीत घातपाताचा कट उधळला, जवानांनी माओवाद्यांना लावले पळवून!

गडचिरोलीत घातपाताचा कट उधळला, जवानांनी माओवाद्यांना लावले पळवून!


अचानक झालेल्या या गोळीबारालाही जवानांनी जशास तसे उत्तर दिले. जोरदार पलटवार केल्यामुळे माओवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

अचानक झालेल्या या गोळीबारालाही जवानांनी जशास तसे उत्तर दिले. जोरदार पलटवार केल्यामुळे माओवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

अचानक झालेल्या या गोळीबारालाही जवानांनी जशास तसे उत्तर दिले. जोरदार पलटवार केल्यामुळे माओवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

  • -MIN READ Gadchiroli,Maharashtra
  • Last Updated :

गडचिरोली, 16 जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यात अभियान राबवणाऱ्या जवानावर माओवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं त्यामुळे माओवाद्यांनी घटनास्थळावरून जीव वाचवून पळ काढला. या घटनेमध्ये माओवाद्यांचे साहित्य जवानांनी जप्त केले आहे. या ठिकाणी माओवादी घातपाताचा कट रचत होते, पण वेळीच जवानांनी हा कट उधळून लावला आहे. गडचिरोली जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली आहे. अहेरी तालुक्यात वेडमपल्ली जंगलात माओवाद्याच्या विरोधात रविवारी दिवसभर सी 60 जवानांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना संध्याकाळी उशीरा माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानावर गोळीबार केला. (पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! गाडी हळू चालवा सांगितल्याने गुंड घरी, VIDEO) अचानक झालेल्या या गोळीबारालाही जवानांनी जशास तसे उत्तर दिले. जोरदार पलटवार केल्यामुळे माओवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या चकमकीच्या ठिकाणी एक पिस्तुल एक बंदुकीसह वॉकी टॉकी आणि माओवादी वापराचे साहित्य सापडले आहे .जवान सुरक्षित पोलीस मुख्यालयात परतले असून माओवाद्यांना या ठिकाणी घातपाताच्या तयारीत असताना जवानाच्या सतर्कतेने बेत उधळला गेला आहे. 24 गुन्हे, 50 हजारांचं बक्षीस; कमांडर नक्षलवादी रेणुका मुर्मूला अटक दरम्यान, जमुई पोलिसांनी नुकतीच सीपीआय माओवादी संघटनेची कमांडर नक्षलवादी रेणुका मुर्मूला अटक केली आहे. झारखंडच्या जसिडीह भागातून तिला अटक करण्यात आली. रेणुका मुर्मूवर पोलिसांनी तब्बल पन्नास हजारांचा इनाम ठेवला होता. (ISI च्या इशाऱ्यावर हिंदू तरुणाची हत्या, पाकिस्तानला पाठवला व्हिडिओ, उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या हत्येचा प्लान) अखेर या महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. रेणुकावर झारखंडसोबतच बिहारमध्येही अपहरण, खंडणी, हत्या या प्रकरणात दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. कमांडर रेणुका ही सीपीआय या माओवादी संघटनेची झोनल सदस्य आहे. तसेच ती भाकपा माओवादी झोनल कमिटीचे सचिव अनुज उर्फ सहदेव सोरेन याची पत्नी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात