ठाणे, 23 मे: ठाण्यात पुन्हा एकदा आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. ठाण्यात (Fire Broke out in Thane) कोठारी वेअरहाऊस (Kothari Warehouse) 3 येथील दोन गोडाऊनला (Godowns)अचानकपणे आग लागली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ठाण्यातील कोठारी कंपाउंड ,टिकुजी-नी-वाडी जवळ, मानपाडा येथील कोठारी वेअरहाऊस 3 येथील दोन गोडाऊनला अचानकपणे पहाटे 3 च्या सुमारास आग लागली होती. या आगीत प्रियंका ट्रेडिंग कंपनी आणि बाजूला असलेले यामाहा बाईक शोरुम होते. घटनास्थळी महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दल, जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित होते.
ठाण्यात कोठारी कंपाऊंड परिसरात भीषण आग pic.twitter.com/UTvLqLwBlu
— News18Lokmat (@News18lokmat) May 23, 2022
सदर घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी नाही, कोणालाही दुखापत नाही. आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सदर आग 6 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली. Diet Tips: धावपळ, कामात सतत बिझी असणाऱ्यांनी या गोष्टी आहारात घ्या; नेहमी उत्साही-निरोगी राहाल सदर घटनेमध्ये मे. प्रियंका ट्रेडिंग कंपनी आणि यामाहा बाईक शोरुम मधील पत्र्यांचे आणि गोडाऊन मध्ये असलेल्या साहित्याचे नुकसान झालं आहे.

)







