Home /News /lifestyle /

Diet Tips: धावपळ, कामात सतत बिझी असणाऱ्यांनी या गोष्टी आहारात घ्या; नेहमी उत्साही-निरोगी राहाल

Diet Tips: धावपळ, कामात सतत बिझी असणाऱ्यांनी या गोष्टी आहारात घ्या; नेहमी उत्साही-निरोगी राहाल

वेळेअभावी जे काही खाद्यपदार्थ पटकन तयार केले जातात ते लोक खात असतात. प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड), पॅक केलेले अन्न, रेडिमेड पदार्थ आपले पोट लगेच भरतील, परंतु ते पौष्टिक घटक पुरवणार नाहीत. यासाठी योग्य आहार जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 23 मे : आजकाल आपण पाहतो की प्रत्येकजण कामात खूप व्यग्र आहे. सर्वांची जीवनशैली धावपळीची बनली आहे. आपल्याला घरातील कामे, ऑफिसमधून किंवा इतर वैयक्तिक कामातून वेळ मिळत नाही. यामुळे आपल्याला खाण्याकडे लक्ष देता येत नाही. आरोग्यदायी गोष्टी कमी आणि अनारोग्यकारक पदार्थ जास्त आपल्या पोटात जातात. कारण, दिवसभर काम करून थकवा आल्यावर आणि वेळेअभावी जे काही खाद्यपदार्थ पटकन तयार केले जातात ते लोक खातात. प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड), पॅक केलेले अन्न, रेडिमेड पदार्थ तुमचे पोट लगेच भरतील, परंतु ते पौष्टिक घटक पुरवणार नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही शारीरिकदृष्ट्या अशक्त होऊ शकता. तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवू शकते. तुम्ही तुमच्या कामात खूप व्यग्र असाल तर तुमच्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा नक्कीच समावेश करा. याच्या मदतीने आपण वर्क-लाइफ तसेच फूड-लाइफ यांच्यात संतुलन निर्माण (Diet Tips for Busy People) करू शकाल. भरपूर फळे आणि भाज्या खा TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, फळे आणि भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, निरोगी शरीरासाठी ते खूप महत्वाचे असतात. हिरव्या भाज्या आणि फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर असतात, त्यामुळे शरीर निरोगी राहते. त्यापैकी किमान 4-5 सर्विंग्स दिवसभर खाल्ल्या पाहिजेत. फळे कापून खावीत, ज्यूस बनवून प्यावे, भाज्या जास्त शिजवल्यानंतर खाऊ नयेत, जेणेकरून जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळतील. हे वाचा -  Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी बाजरी, ज्वारी भरपूर खा - दररोज गव्हापासून बनवलेल्या पोळी आणि तांदळाचे सेवन करता, परंतु ते मर्यादित प्रमाणात खा. कारण पांढरा तांदूळ तपकिरी किंवा काळ्या तांदळाच्या तुलनेत तितका आरोग्यदायी नाही. तुम्ही त्यांचेही सेवन करा, पण तुमच्या आहारात नाचणी, ज्वारी, बाजरीच्या भाकरी हव्या. या संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचाही समावेश करा. त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते. पोट साफ होते. बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादींमध्ये फायबर, प्रथिने, अँटिऑक्सिडंट असतात, तसेच ते ग्लुटेनमुक्त देखील असतात. शरीराला अधिक ऊर्जा मिळेल. हे वाचा - Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या डाळी पण खा - बरेच लोक कडधान्ये नियमितपणे खात नाहीत, निरोगी राहण्यासाठी कडधान्ये खूप महत्त्वाची आहेत. कडधान्ये पोषक तत्वांचा खजिना आहेत. मसूर डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतात, जे डोळ्यांसाठी खूप आरोग्यदायी असते. तुम्हाला दीर्घायुष्यासाठी निरोगी राहून तुमचे काम करत राहायचे असेल, तर रोज डाळींचा आहारात समावेश करा. बीन्स, कडधान्ये, शेंगा प्रत्येक दिवसाची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या गरजा भागवतात. कडधान्य, सोयाबीन, शेंगा खाल्ल्याने शरीर मजबूत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या