मुंबई, 10 मार्च : सध्या जुन्या पेन्शन योजनेवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 2005 मध्ये राज्यात बिकट परिस्थिती होती त्यामुळे नवी पेन्शन स्किम स्विकारली. काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. आपण जर जुनी पेन्शन योजना लागू केल्यास आता फरक पडणार नाही, मात्र 2030 नंतर त्याचा परिणा दिसून येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले फडणवीस? 2005 मध्ये राज्याची परिस्थिती बिकट होती त्यामुळे नवी पेन्शन योजना स्विकारण्यात आली. जगात जिथं पेन्शन स्किम आहे, ती नवीन पद्धतीनं लागू करण्यात आल्याचं पहायला मिळतं. प्रगत जगात जुनी पेन्शन स्किम कुठेही लागू नाही. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांचेही कल्याण बघावं लागतं. विविध योजना राबवायच्या आहेत. जुन्या पेन्शन योजनेमुळे मोठा आर्थिक भार निर्माण होतो असं दवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. BREAKING : खा. जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नामातंराला विरोध भोवणार? चर्चेतून मार्ग निघेल पुढे बोलताना ते म्हणाले की, काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली. आता सध्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू केली तर फार फरक पडणार नाही. मात्र याचे परिणाम हे 2030 नंतर दिसून येतील. लोकप्रिय निर्णय घेवू शकतो,पण राज्याचाही विचार करायला हवा.अहलुवालिया यांनी जुन्या स्किमकडे जाणे हे डिजास्टरकडे जाण्यासारखे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जावू शकतो. कर्मचाऱ्यांनी संप करू नये, तसेच विरोधकांनीही या गोष्टीचे राजकारण करू नये असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.