मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : खा. जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नामातंराला विरोध भोवणार?

BREAKING : खा. जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नामातंराला विरोध भोवणार?

खासदार जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

खासदार जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलील यांनी गुरुवारी नामांतराच्याविरोधात कँडल मार्च काढला होता, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छत्रपती संभाजीनगर, 10 मार्च : अविनाश कानडजे :  छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जलील यांनी गुरुवारी नामांतराच्याविरोधात कँडल मार्च काढला होता. मात्र या कँडल मार्चला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती. परवानगी नसतानाही कँडल मार्च काढल्यानं खासदार इम्तियाज जलील यांच्यासह तब्बल एक हजारांपेक्षा अधिक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 वाद पेटला 

सध्या छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्दा चांगलाच पेटला आहे. एमआयएमकडून औरंगाबादच्या नामांतराला विरोध होत आहे. याविरोधात एमआयएमचे खासदार एम्तियाज जलील यांनी उपोषण देखील केलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलिसांची परवानगी नसतानाही काल कँडल मार्च काढला. या प्रकरणात आता जलील यांच्यासह हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असतानाच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिदे, फडणवीस सरकार सत्तेत आले. नव्या सरकारने नामांतराचा प्रस्ताव रद्द केला व पुन्हा नव्याने तयार करण्यात आला. या प्रस्तावला केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आल्यानंतर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. मात्र या नामकरणाला एमआयएमकडून जोरदार विरोध होत आहे. एमआएमच्या वतीनं शहरात नामंतराच्याविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला. आता या प्रकरणात जलली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Chhatrapati Sambhaji Nagar