मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आजपासून शिंदे गटात जातोय', निरोप घेताना शिवसेनेचा 'अर्जुन' हमसूनहमसून रडला

'आजपासून शिंदे गटात जातोय', निरोप घेताना शिवसेनेचा 'अर्जुन' हमसूनहमसून रडला

आपल्या कार्यकर्त्याला सेफ कऱण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजून घेतले

आपल्या कार्यकर्त्याला सेफ कऱण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजून घेतले

आपल्या कार्यकर्त्याला सेफ कऱण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजून घेतले

  • Published by:  sachin Salve

औरंगाबाद, 30 जुलै : 'काही परिस्थितीमुळे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहे. शिंदे गटात जाण्याआधी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकले आहे. त्यामुळे त्यांचं समाधान झालं आहे, आज मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे' असं म्हणत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले.

जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेऊन अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जात असल्याचे सांगताना अश्रू अनावर झाले.

'माझ्यावर जी काही परिस्थिती आली आहे, ती मला माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुखांशी बोललो, संजय राऊतांशी बोललो. सगळ्यांशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. पण घरी आल्यावर परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणे गरजेचे आहे. मी पक्षप्रमुखांकडे मागणी केली आणि त्यांनी मला काय बोलायचे ते सांगितले. त्यामुळे मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. मी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहे. काही परिस्थितीमुळे निर्णय घ्यावा लागत आहे. हे पक्षाच्या कानावर टाकले आहे. त्यामुळे त्यांचं समाधान झालं आहे, आज मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे' असं म्हणत अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले.

आपल्या कार्यकर्त्याला सेफ कऱण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजून घेतले. तुम्ही अडचणीत आहात तर निर्णय घेऊ शकतात, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्यांचं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.

First published: