फिल्मी स्टाईल अपहरण.. गाडी खराब झाल्यानं बिल्डरला रस्त्यात सोडून अपहरणकर्ते फरार

फिल्मी स्टाईल अपहरण.. गाडी खराब झाल्यानं बिल्डरला रस्त्यात सोडून अपहरणकर्ते फरार

बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणाला आता नवं वळण लागलं

  • Share this:

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 4 नोव्हेंबर: शहरातीस देवीनगरी बुधवारी सकाळी झालेल्या बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. अपहरण झालेले नाझीम पठाण राउफ पठाण हे औरंगाबादेतून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या भालगावजवळ जखमी अवस्थेत सापडले आहेत. विशेष म्हणजे अज्ञात अपहरणकर्ते खराब झालेली गाडी रस्त्यावर सोडून फरार झाले आहेत.

हेही वाचा...65 कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या अधीक्षकाचे कोरोनामुळे निधन

जखमी अवस्थेत बांधकामा व्यावसायिक नाझीम पठाण राउफ पठाण यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपहरणकर्त्यांनी नाझीन पठाण यांच्या पायवर गोळी मारली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप याबाबत पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही.

पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत बांधकाम व्यावसायिक नाझीम पठाण यांचं बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अपहरण केलं होतं. शहरातील देवानगरी जवळील पीडब्ल्यूडी कॉलनीत ही घटना घडली होती. दिवसाढवळ्या ही घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.

मात्र, सुदैवानं अपहरणकर्त्याची गाडी खराब झाल्यानं त्यांनी नाझीज पठाण यांना जखमी अवस्थेत सोडून अपहरणकर्ते फरार झाले आहेत. पोलिसांनी अपहरणकर्त्यांची खराब झालेली गाडी जप्त केली आहे. गाडी कोणाच्या नावावर आहे, याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराच बांधकामचा ठेका पठाण यांनी घेतला होता. आज सकाळी ते साईडवर आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्याचवेळी त्यांना धक्का देत यांना गाडीमध्ये ढकलत हवेत गोळीबार करून तेथून पसार झाले होते.

बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले असता हल्लेखोरांनी तोपर्यंत पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा..मंदिरात नमाज पठणानंतर आता भाजपच्या नेत्याने वाचली मशिदीत हनुमान चालीसा

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येत असून प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास पोलिस अधिकारी नकार देत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 4:41 PM IST

ताज्या बातम्या