65 कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या तुरुंग अधीक्षकाचा कोरोनानं घेतला बळी

65 कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या तुरुंग अधीक्षकाचा कोरोनानं घेतला बळी

मंगळवारी उपचार करून घरी परतले असता संजय कांबळे यांची बुधवारी पहाटे प्राणज्योत मालवली.

  • Share this:

बीड, 4 नोव्हेंबर: बीड जिल्हा कारागृहात (Beed District Jail)तब्बल 65 कैद्यांना कोरोनाची (Coronavirus) बाधा झाली होती. जीवाची बाजी लावून कारागृह अधीक्षक संजय कांबळे (Jail Superintendent Sanjay Kamble ) यांनी सगळ्याच कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं होतं. मात्र, कोरोनामुळे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचं कोरोनामुळे निधन (Death) झालं.

काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर संजय कांबळे यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी ते उपचार करून घरी परतले असता संजय कांबळे यांची बुधवारी पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. ते एक उत्तम साहित्यिकही होते.

हेही वाचा...आई-वडिलांनीच झुडपात नेऊन पोटच्या मुलीचा ओढणीनं आवळला गळा, तितक्यात..

संजय कांबळे मुंबई असताना मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अजमल कसाब याची सुरक्षा व्यवस्था त्यांच्या नियंत्रणात होती. ही मोठी जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली होती. मुंबईनंतर मागील काही महिन्यापासून ते बीड येथे जिल्हा कारागृहाचे अधिक्षक म्हणून काम पाहत होते. शिवाय अभिनेता संजय दत्त याच्या सेलचे ते प्रमुख राहिले होते.

एकाच दिवशी 50 कैद्यांना झाला होता कोरोना..

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्याचा बीड जिल्ह्यातही फैलाव झाला होता. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी बीड कारागृहातील 50 हून अधिक कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती कारगृह अधीक्षक संजय कांबळे यांनी एखाद्या कोरोना यौद्धासारखी हाताळली होती. व्यवस्थीत नियोजन करून संजय कांबळे यांनी सगळ्याच कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं होतं. मात्र, संजय कांबळे यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.

हेही वाचा...पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका

बीडमध्ये कारागृहाच्या सुरक्षेसह संजय कांबळे यांनी विविध सामाजिक उपक्रमांतही पुढाकार घेतला होता. त्याचा मोठा मित्र परिवारही आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या