जालना, 10 जुलै: भेळ खरेदी करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर (Hassle over buying bhel), प्रवाशी आणि फेरीवाल्यांत तुफान हाणामारी (fight between peddlers and passengers) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे. हा संतापजनक प्रकार जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस रेल्वेत (Tapovan Express) झाला आहे. भांडण सुरू असताना एका प्रवाशानं ही सर्व घटना आपल्या मोबाइलमध्ये चित्रीत केली आहे. या घटनेबाबत कुठेही पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नाही.
खरंतर, अनेकदा फेरीवाले दादागिरी करत प्रवाशांची लूट करत असतात. खराब दर्जाचा किंवा वॉरंटी संपलेल्या गोष्टी रेल्वे प्रवाशांना विकल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. दरम्यान जालन्यातील परतूर रेल्वेस्थानकात भेळ खरेदीवरून प्रवाशी आणि फेरीवाल्यांत वाद झाला आहे. बाचाबाचीवरून सुरू झालेलं हे प्रकरण शेवटी हाणामारी करून मिटवलं आहे.
हेही वाचा-बापरे! या चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल, VIDEO होतोय व्हायरल
शुक्रवारी दुपारी तपोवन एक्सप्रेस जालना जिल्ह्यातील परतूर रेल्वे स्थानकावर उभी होती. दरम्यान या रेल्वेत भेळ विकणारे काही तरुण घुसले. भेळ खरेदीवरून फेरीवाला आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला. काही वेळी बाचाबाची झाल्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. फेरीवाल्यांनी आणि प्रवाशांनी दोघांनीही एकमेकांना मारहाण केली आहे.
भेळ खरेदीवरुन वाद, जालन्यात तपोवन एक्स्प्रेसमध्ये प्रवासी-फेरीवाला यांची हाणामारी pic.twitter.com/zVsPWZPjSi
— Anish Bendre (@BendreAnish) July 10, 2021
हेही वाचा-VIDEO: दलित तरुणाला जात विचारत बेदम मारहाण; टोळक्यानं गुप्तांगावरही केला हल्ला
प्रवाशांना मारहाण केल्यानंतर फेरीवाल्याचं टोळकं परतूर रेल्वे स्थानकावरचं उतरलं आहे. दरम्यान भांडण झालेल्या डब्ब्यात काही काळ तणावाच वातावरण झालं होतं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. याप्रकरणी कुठेही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beating retreat, Viral video.