मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुरामुळे खराब झालेल्या अन्नधान्यापासून केली जाणार खतनिर्मिती; महाराष्ट्रात अभिनव प्रयोग

पुरामुळे खराब झालेल्या अन्नधान्यापासून केली जाणार खतनिर्मिती; महाराष्ट्रात अभिनव प्रयोग

अभिनव प्रयोग: अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यात 6000 क्विंटल धान्य भिजून वाया गेलं होतं. आता त्याचा वापर खतनिर्मितीसाठी होत आहे.

अभिनव प्रयोग: अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यात 6000 क्विंटल धान्य भिजून वाया गेलं होतं. आता त्याचा वापर खतनिर्मितीसाठी होत आहे.

अभिनव प्रयोग: अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यात 6000 क्विंटल धान्य भिजून वाया गेलं होतं. आता त्याचा वापर खतनिर्मितीसाठी होत आहे.

भंडारा, 9 सप्टेंबर: खरीप आणि रब्बी हंगामात सरकार (Modi Government) शेतकऱ्यांकडून किमान हमीभावानं अन्नधान्य (Food grains) खरेदी करते. खरेदी केलेल्या अन्नधान्याची शासकीय गोदामांमध्ये (Godown) साठवणूक केली जाते. मात्र अन्नधान्य खरेदी आणि साठवणूक क्षमता यांच्यातील व्यस्त प्रमाण दरवर्षी अधोरेखित होतं. अपुऱ्या साठवण सुविधेमुळं दरवर्षी अन्नधान्याचं मोठं नुकसान होतं. विदर्भात दरवर्षी धानाची  शासकीय खरेदी होते. परंतु, साठवणुकीसाठी जागा पुरेशी नसल्यानं पावसामुळं धानाचं मोठं नुकसान होतं. शासकीय गोदामांमधील अन्य अन्नधान्याची स्थितीदेखील काही वेगळी नसते. गतवर्षी भंडारा (Bhandara) जिल्ह्यात वैनगंगा नदीला जोरदार पावसानं पूर आला होता. यापुरामुळं (Flood) शासकीय गोदामातील सुमारे 6 हजार क्विंटल अन्नधान्य भिजलं. या भिजलेल्या अन्नधान्यामुळे दुर्गंधी पसरली. हे अन्नधान्य जनावरंही खाईना झाली. यावर पर्याय म्हणून आता एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. या अन्नधान्यापासून खतनिर्मितीचा (Composting) प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं सरकारला पाठवला होता. त्यास आता मंजुरी मिळालेली आहे. याबाबतचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`नं दिलं आहे.

भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना गतवर्षी वैनगंगा नदीच्या पुराचा फटका बसला. शासकिय गोदामंही या स्थितीला अपवाद नव्हती. शासकिय गोदामांमध्ये 5 ते 6 फूट पाणी साठल्यानं अन्नधान्याचं नुकसान झालं. या गोदामांतील 6 हजार क्विंटल अन्नधान्य खराब झालं. हे अन्नधान्य वापरण्यायोग्य नसल्यानं ते जनावरांना देणंही अशक्य होतं. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 28 ऑक्टोबर 1999 च्या निर्णयाआधारे यातून खतनिर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला. शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे.

Nutrition Week 2021: अशी ओळखा भाज्या, हळद, मीठ आणि दुधातली भेसळ

 गेल्या वर्षभरापासून हे अन्नधान्य गोदामांमध्ये पडून होतं. त्यातच पुरामुळं त्याचं मोठं नुकसान झालं. शासनानं खतनिर्मिती प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं आता हे अन्नधान्य साकोली कृषी विज्ञान केंद्रात (Sakoli KVK) पाठवलं जाणार आहे. तिथं या सडलेल्या अन्नधान्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली तहसील आणि कृषी विभाग संयुक्तपणे या अन्नधान्याचं नियोजन करेल.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारने MSP बद्दल घेतला मोठा निर्णय

या गोदामांमधील सुमारे 17 हजार क्विंटल अन्नधान्यापैकी जवळपास 6263 क्विटल अन्नधान्य पुराच्या पाण्यामुळे खराब झालं होतं. यात 3826 क्विंटल धान (तांदूळ), 1833 क्विंटल गहू, 266 क्विंटल तूर डाळ, 188 क्विंटल हरभरा डाळ, 144 क्विंटल साखरेचा समावेश आहे. पुर ओसरल्यानंतर हे धान्य सुकवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. धान्य सुकल्यानंतर ते सुरक्षितपणे अन्य गोदामांमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु, त्यास दुर्गंधी सुटल्यानं परिसरातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खतनिर्मिती करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव आता मंजूर झाला आहे.

First published:

Tags: Agriculture, Protesting farmers