मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मैत्रिणीनं प्रेमास नकार दिल्यानं सांगलीतील तरुणाचा हाय होल्टेज ड्रामा; आत्महत्येसाठी टेरेसवर चढला पण...

मैत्रिणीनं प्रेमास नकार दिल्यानं सांगलीतील तरुणाचा हाय होल्टेज ड्रामा; आत्महत्येसाठी टेरेसवर चढला पण...

मैत्रिणीला प्रपोज केल्यानंतर तिने प्रेमसंबंधास नकार (female friend refused to love affair) दिल्यामुळे सांगलीतील एका तरुणाने हाय होल्टेज ड्रामा केला आहे.

मैत्रिणीला प्रपोज केल्यानंतर तिने प्रेमसंबंधास नकार (female friend refused to love affair) दिल्यामुळे सांगलीतील एका तरुणाने हाय होल्टेज ड्रामा केला आहे.

मैत्रिणीला प्रपोज केल्यानंतर तिने प्रेमसंबंधास नकार (female friend refused to love affair) दिल्यामुळे सांगलीतील एका तरुणाने हाय होल्टेज ड्रामा केला आहे.

सांगली, 08 ऑक्टोबर: मैत्रिणीला प्रपोज केल्यानंतर तिने प्रेमसंबंधास नकार (female friend refused to love affair) दिल्यामुळे सांगलीतील एका तरुणाने हाय होल्टेज ड्रामा केला आहे. मैत्रिणीनं प्रेमसंबंधासाठी नकार दिल्याच्या कारणातून संबंधित तरुण आत्महत्या करण्यासाठी टेरेसवर गेला (Went to terrace to commit suicide) होता. याठिकाणी तो नकार देणाऱ्या मुलीला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करण्याची धमकी (Suicide threat on video call) देत होता. यासाठी तो इमारतीच्या संरक्षक भिंतीवर देखील चढला पण गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे संबंधित तरुणाचे प्राण वाचले आहेत. पण तरुणाच्या या कृत्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वास रोखून धरावा लागला आहेत.

मैत्रिणीनं प्रेमास नकार दिल्याने जीव द्यायला गेलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवल्यामुळे संबंधित तरुणाच्या आई-वडिलांनी अश्रू ढाळत पोलीसांचे आभार मानले आहेत. संबंधित घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आहे. संबंधित तरुण आपल्या राहत्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर जावून संरक्षक भिंतीवर चालत होता. तसेच व्हिडीओ कॉल करून मैत्रिणीला प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी विनवणी करत होता. पण तिने प्रेमसंबंधाला साफ नकार देत आपण मैत्री ठेवू असं सुनावलं.

हेही वाचा-मुंबई पुन्हा हादरली; 6 वर्षीय चिमुकलीसोबत डिलिव्हरी बॉयचं घृणास्पद कृत्य

तरुणीनं नकार दिल्यानं संबंधित तरुणानं आरडाओरडा करत थेट आत्महत्येची धमकीच दिली. इस्लामपूरातील पेठ रस्त्यावरील विलासराव पाटील पंपाच्या पाठीमागील पाटील इस्टेट या तीन मजली इमारतीच्या छतावर हा प्रकार घडला. हा तरुण या इमारतीत भाड्यानं राहत होता. तो व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून नकार देणाऱ्या तरुणीला भीती दाखवत होता. तेव्हा काही स्थानिक तरुणांनी याची पोलिसांना दिली.

हेही वाचा-संतापजनक! जात पंचायतीकडून महिलेस नग्न करत मारहाण; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखून बिल्डिंगच्या छतावर धाव घेतली. तसेच निराश होऊन आत्महत्या करत असल्याचं सांगणाऱ्या तरुणाला बोलण्यात गुंतवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेऊन त्याचं मनपरिवर्तन केलं आहे. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाच्या आई वडिलांना याची माहिती दिली आहे. हा तरुण केवळ वीस वर्षांचा असून तो अद्याप महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तसेच जवळच्या एका कॅफेत कूक म्हणून देखील तो काम करतो. त्याचे कुटुंबीय जयसिंगपूर येथे वास्तव्याला आहेत. एकुलत्या एक मुलाच्या या कृत्यानं आई-वडिलांना देखील अश्रू अनावर झाले होते.

First published:
top videos

    Tags: Love, Sangli, Suicide