भाईंदर, 08 मार्च : रस्ता ओलांडत असताना झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई (Mumbai) जवळील मिरा भाईंदर (Mira Bhayandar) परिसरात घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV VIDEO) समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 तारखेची ही घटना आहे, जगराम रामविलास प्रजापती (Jagram Ramvilas Prajapati, वय 41) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. जगराम हे त्यांचा मुलगा अमितला (Amit) कॉम्प्युटर घेण्यासाठी शनिवारी सकाळी भाईंदर रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होते. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी वाहतूक सुरू होती.
रस्त्यावरून पायी जात असताना अचानक उंबराच्या (umber) झाडाची फांदी जयराम प्रजापती आणि त्यांचा मुलगा अमित यांच्यावर कोसळली. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावरील वाहतूक जागेवरच थांबली. या दुर्घटनेत जयराम प्रजापती यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डोक्याला मार लागल्यामुळे जयराम प्रजापती यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मुलगा अमित किरकोळ जखमी झाला.
या माणसानं साडीपासून केला जुगाड; VIDEO पाहून म्हणाल काय टॅलेंट आहे!
झाडाची फांदी पडून जगराम यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगराम यांचा दुर्दैवी मृत्यू प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.