मुंबई, 8 मार्च : अनोख्या पद्धतीनं जुन्यापासून नवं काहीतरी करून दाखवणारे असंख्य व्हिडिओज सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. भारतीय लोकांमध्ये तर असा जुगाड करण्याची कला विशेष दिसते. (Saree Art Video)
आता असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. लोक अनेकदा जुन्या साड्यांपासून अनेक सुंदर वस्तू बनवत असतात. ड्रेस, ओढण्या, पर्स, पडदे अशा जुन्या साड्यांच्या बनवलेल्या गोष्टी खासच असतात. मात्र तुम्ही कधी साडीची बनवलेली दोरी पाहिली आहे का? (saree jugaad video on Instagram)
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जुन्या साडीपासून अवघ्या काही मिनिटात एक दोरी बनवतो. हा व्हिडिओ खूप वेगात व्हायरल होतो आहे. लोक हा व्हिडिओ पाहून एकदम हैराण आहेत. (Instagram viral video Saree rope)
India you never fail to amaze me with your spirit of innovation - and making a go of “what is”! ❤️
How to make a rope with an old saree. pic.twitter.com/JO4dFnYldy
— अद्वैता काला #StayHome 😷 (@AdvaitaKala) March 5, 2021
हा व्हिडिओ लेखक अद्वैत काला यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे, 'भारत कायमच आपल्या नवनव्या, अनोख्या प्रयोगांनी मला आश्चर्यचकित केल्यावाचून राहत नाही. अजून काय असेल? बघा कशी एका जुन्या साडीची दोरी बनवलीय!' (man makes Saree rope video)
हेही वाचा 70 फूट खोल दरीत कोसळली कार, 5 ते 6 वेळा झाली पलटी पण तिघे तरुण बचावले, VIDEO
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लोकांनी एक साडी पकडून ठेवली आहे. त्यांनी साडीचे बरेच तुकडे केले आहेत. मग त्यांना बाईकवर लागलेल्या एका मशीनमध्ये टाकलं. मग तुम्ही पहाल, एक व्यक्ती मशीनचं हँडल चालवतो आहे. आणि काही मिनिटातच एक मजबूत दोरी बनून तयार होते आहे.
हेही वाचा घोड्याला खांद्यावर घेतो, अंगावरून कार गेली तरी सहीसलामत,पाहा या ताकदवानाचे VIDEO
लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडतो आहे. ही दोरी बनवणाऱ्याच्या टॅलेंटचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.