जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लेकीच्या लग्नाचा मंडप उभारताना विजेच्या धक्क्याने वडिलांचा मृत्यू, बीडमधील घटना

लेकीच्या लग्नाचा मंडप उभारताना विजेच्या धक्क्याने वडिलांचा मृत्यू, बीडमधील घटना

 मुलीला हळद लागली आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलीला हळद लागली आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलीला हळद लागली आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 23 एप्रिल : लाडक्या लेकीचे लग्न असल्यामुळे घरी जोरदार तयारी सुरू होती. मुलीच्या लग्नाचा ( daughter wedding) मंडप उभारताना विद्युत तारेचा शॉक (electric shock ) लागून वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या वडवणी तालुक्यात घडली. त्यामुळे मंगलप्रसंगी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील  टोकेवाडी इथं ही मन हेलावून टाकणारी घटना घडली.  हनुमंत अंबादास डोंगरे (वय 34) असं मृत पित्याचे नाव आहे. आपल्या लेकीचं लग्न असल्यामुळे हनुमंत डोंगरे यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. मुलीचे लग्न उद्या म्हणजे रविवारी पार पडणार होते. त्यामुळे मुलीच्या लग्नाचा मंडप उभारण्यात येत होता. मात्र, अचानक नवरी मुलीच्या पिता हनुमंत अंबादास डोंगरे यांना विद्युत तारेचा धक्का बसला. ( “हात नाही लावायचा….” नवनीत राणांच्या घरात पोलीस शिरले तेव्हा काय झालं, VIDEO ) विजेचा जोराचा धक्का बसल्यामुळे त्यांनी एकच गोंधळ उडाला. तातडीने त्यांना बाजूला करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता मृत घोषित करण्यात आले.  मुलीला हळद लागली आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ( कंबोज यांच्यापाठोपाठ किरीट सोमय्यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली ) या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. लग्नाऐवजी अंत्यसंस्कार करण्याची वेळ डोंगरे कुटुंबावर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात