मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Chandrapur Accident : चारचाकी चालकाचं नियंत्रण सुटलं, चंद्रपुरात दोघांना उडवलं; भयानक VIDEO

Chandrapur Accident : चारचाकी चालकाचं नियंत्रण सुटलं, चंद्रपुरात दोघांना उडवलं; भयानक VIDEO

चंद्रपूर अपघात बातमी

चंद्रपूर अपघात बातमी

चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात रात्रीच्या सुमारास भयानक अपघात झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chandrapur, India

हैदर शेख प्रतिनिधी

चंद्रपूर, 18 डिसेबर : राज्यात काही दिवसांमध्ये अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात रात्रीच्या सुमारास भयानक अपघात झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना -

चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात रात्रीच्या सुमारास भयानक अपघात झाला. अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव वेगातील अनियंत्रित चारचाकीने दोघांना उडविल्याचे कैद झाले. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघेही गंभीर जखमी आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते सिंधी कॉलनी जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर हा अपघात झाला.

रात्री साडेअकरा वाजता चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बंडू ढोले व ओम ईटणकर यांना उडविले. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चारचाकी चालक विनीत तावडे याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ हा मोठा मार्ग असला तरी दुकान व घरांच्या अतिक्रमणाने यावर दिवसरात्र मोठी वाहतूक कोंडी होते.

हेही वाचा - 'फोन केला तर ती फक्त रडत होती', 8 मित्रांचे सैतानी कृत्य

सोलापूर जिल्ह्यातन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात टोल कर्मचाऱ्याने टोलसाठी गाडी अडवली याचा राग मनात धरून सरपंचाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला, असा आरोप कर्मचाऱ्याने केला आहे.

टोल नाक्यावरील मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. टोल कर्मचारी अझरुद्दीन फुलारी याने हा आरोप केला आहे. तर बेगमपूरचे सरपंच अस्लम चौधरी यांनी मारहाण केल्याचा आरोपी टोल कर्मचाऱ्याने केला आहे. सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गावरील इचगाव टोलनाक्यावर हा प्रकार घडला आहे. ही मारहाणीची घटना शनिवार 17 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

First published:

Tags: Accident, Chandrapur