पालघर, 18 डिसेंबर, राहुल पाटील: पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या एका मित्रासह आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या एका बंगल्यामध्ये या नराधमांनी या मुलीवर अत्याचार केला. तिच्या मित्राने संबंधित मुलीला या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर आठ जणांकडून बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, आठही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमारास पीडितेच्या वडिलांनी आपली मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार सातपाटी पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच तीला फोन लावला असता ती फोनवर फक्त रडते अशी माहिती दिली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीमान केली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला हरणवाडी परिसरातून ताब्यात घेतलं. हेही वाचा : कबड्डी स्पर्धेदरम्यान युवकासोबत धक्कादायक प्रकार, अमरावतीमधील प्रकाराने खळबळ आरोपींना अटक पीडितेच्या मित्राने तिला माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या एका बंगल्यामध्ये बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या मित्रांनी या मुलीवर बलात्कार केला. या आठही जणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे . या आरोपींवर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपाटी सागरी पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.