लॉकडाऊनमध्ये करायचं काय? शेतकरी दाम्पत्याने अंगणातच खोदली विहीर

लॉकडाऊनमध्ये करायचं काय? शेतकरी दाम्पत्याने अंगणातच खोदली विहीर

लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही अशा वेळी घरात बसून काय करायचे म्हणून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अंगणातच दाम्पत्यानं विहीर खोदली आहे.

  • Share this:

वाशिम, 19 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. सुरुवातीला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा कऱण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवून 3 मेपर्यंत करण्यात आला. यामुळे देशातील सर्वच नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. याकाळात लोक काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी घरातली लहान लहान कामं उरकून घेतली. मात्र, वाशिम जिल्ह्यात एका पती पत्नीने मिळून विहीर खोदली आहे. त्यांनी घराच्या अंगणातच तब्बल 25 फूट खोल विहीर खोदली असून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यात असलेल्या कारखेडा या गावात गजानन पकमोडे हे राहतात. गजानन हे गवंजी काम करतात. मात्र, राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे बाहेर कोणतं काम करणं शक्य नव्हतं. अशावेळी घरी बसून काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पाणी टंचाई भेडसावत असल्यानं गजानन आणि त्यांची पत्नी पुष्पा यांनी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा : मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड, ऑक्सिजन सिलिंडर जमिनीवर आपटला

दोघांनीही विहीर खोदण्याचा निर्णय घेतल्यानंतर कामाला सुरूवात केली. घराच्या अंगणातच गजानन पकमोडे आणि पुष्पा पकमोडे यांनी ही विहीर खोदली. या विहीरीला 25 फूटांवर पाणी लागलं आहे. यामुळे त्यांच्या कष्टाचं फळ मिळाल्याची भावनाही गजानन यांनी व्यक्त केली.

हे वाचा : भाजी विक्रेताच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, 2000 लोकांना केलं होम क्वारंटाइन

देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांची तीन हजारांच्या वर गेली असून मृतांचा आकडा 201 झाला आहे. दरम्यान, राज्य सरकार लॉकडाऊनच्या काळात ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांसाठी नियम शिथिल करण्याबाबत विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

हे वाचा : आनंदाची बातमी! गोवाही झालं कोरोनामुक्त, 3 एप्रिलनंतर एकही रुग्ण नाही

First published: April 19, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या