जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO : भरवस्तीत दिवाळीआधी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 जणांचा होरपळून मृत्यू

VIDEO : भरवस्तीत दिवाळीआधी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 जणांचा होरपळून मृत्यू

VIDEO : भरवस्तीत दिवाळीआधी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 जणांचा होरपळून मृत्यू

दिवाळी सण अगदी तोंडावर आला असताना फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कुशीनगर, 04 नोव्हेंबर: दिवाळी सण अगदी तोंडावर आला असताना फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाची भीषणता इतकी भयंकर होती की कारखाना जळून खाक झाला. या कारखान्यात आधी स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकली. फटाके असल्यानं ही आग वाढत गेली आणि रौद्र रुप धारण केलं. संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी होता. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले मात्र फटाक्यांच्या कारखान्यत अक्षरश: आगडोंब उसळला होता. यामध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात

हे वाचा- दिवाळीआधी दोन मजुरांचं नशीब फळफळलं! खोदकाम करताना सापडले 2 मौल्यवान हिरे ही घटना उत्तर प्रदेशातील कुशीनगर परिसरात कप्तानगंज पोलीस ठाणा क्षेत्रात मंगल बाजार परिसरात घडली आहे. हा कारखाना फटाके तयार करण्याचं लायसन आणि परवानगी न घेता चालवला जात असल्याची माहिती मिळाली आहे. ही फॅक्ट्री अवैध स्वरुपानं चालवली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दाट वस्तीत सुरू असलेल्या या अवैध कारखान्यात फटाक्यांचं काम सुरू होतं आणि अचानक स्फोट झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात