फुकट्या 'भाई'ची दिवाळी खरेदी, दुकानात घुसून लुटले 20 हजाराचे कपडे, पुण्यातील VIDEO

फुकट्या 'भाई'ची दिवाळी खरेदी, दुकानात घुसून लुटले 20 हजाराचे कपडे, पुण्यातील VIDEO

दोन दिवसांपूर्वी थॉमस कॉलनी येथील व्यापारी महिला तसंच तिच्या पतीला हप्ता न दिल्याच्या कारणावरून गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

देहूरोड, 02 नोव्हेंबर : ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे (Pune) जिल्ह्यातील  देहूरोड (DehuRoad) शहर दुर्देवाने मागील काही महिन्यांपासून  गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखू लागले आहे. शहरात पोलीस व कायद्याचा धाक न उरल्याने शहरातील गुंड प्रवृत्तीचे 'भाई' सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापार्‍यावर धाक दाखवून लुटत आहे. अशाच्या एका गुंडाचा एका व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.

देहूरोड शहरातील आंबेडकर नगर, शितळा नगर, एम बी कॅम्प, पारसी चाळ या सारख्या झोपडपट्टी असलेल्या भागात दररोज गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, हप्ते वसुली अशा घटनांमुळे देहूरोड शहर पूर्णपणे हादरून गेले आहे.

दोन दिवसांपूर्वी थॉमस कॉलनी येथील व्यापारी महिला तसंच तिच्या पतीला हप्ता न दिल्याच्या कारणावरून गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच देहूरोड बाजारपेठेत जीवे मारण्याची धमकी देत शस्त्राचा धाक दाखवून गुंडांनी दोन कापड व्यावसायिकांकडून जवळपास 20 हजारांचे नवीन कपडे लंपास केले आहे. दुकानातील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घडलेला दहशतीचा प्रकार रेकॉर्ड झाला आहे. त्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.

पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात, ट्रकची 5 ते 6 गाड्यांना धडक, VIDEO

दररोज घडत असणाऱ्या अशा घटनांमुळे मेन बाजार, पारशी चाळ येथील व्यापारी भयभीत झाले आहेत. सशस्त्र असणाऱ्या गुंडांकडून जीवाचे बरे वाईट होऊ नये, या भीतीने व्यापारी त्यांच्या विरोधात बोलण्यासही धजावत आहेत. 'शहरात पोलिसांची विश्वासाहर्ता पूर्णपणे कमी झाल्याने यापुढे गुंडांना हप्ता देऊन स्वतःचे रक्षण करून घेण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली' असल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत सूर्वे यांनी व्यक्त केले आहे.

...म्हणूनच कार्यकर्ते राजीनामे देत आहेत, खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

देहूरोड शहरात गुंडगिरीला आळा घालण्यासाठी खमक्या पोलीस अधिकारी देहूरोड पोलीस ठाण्याला मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. भयमुक्त वातावरणात नागरिकांना राहता यावं यासाठी पोलीस आयुक्तांकडून निरनिराळ्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, देहूरोड सारख्या शहरात कायद्याचा धाक सर्वसामान्य नागरिकांना तर दहशत पसरवणारे गुंड उजळ माथ्याने मोकाट फिरत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Published by: sachin Salve
First published: November 2, 2020, 1:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या