मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : रत्नागिरीत गुहागरच्या समुद्रकिनारी स्फोटक सदृश्य वस्तू, परिसरात खळबळ

VIDEO : रत्नागिरीत गुहागरच्या समुद्रकिनारी स्फोटक सदृश्य वस्तू, परिसरात खळबळ

गुहागरच्या समुद्रकिनारी आज स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली.

गुहागरच्या समुद्रकिनारी आज स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली.

गुहागरच्या समुद्रकिनारी आज स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली.

रत्नागिरी, 3 जून : गुहागरच्या समुद्रकिनारी (Guhagar beach) आज स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली. या स्फोटकांमुळे समुद्रकिनारी मोठा घातपात घडवण्याचा डाव होता की काय? अशी भीती स्थानिक नागरिकांकडून वर्तवण्यात येत होती. पण याबाबत नेमकं खरं काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण बॉम्ब शोध नाशक पथकाने संबंधित स्फोटक सदृश्य वस्तू मोकळ्या जागेत नेवून निकामी केलं. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सूटकेचा श्वास घेतला.

गुहागरच्या वेळणेश्वर समुद्र किनारपट्टीवर स्फोटक सदृश्य वस्तू काही नागरिकांना दिसली. त्यानंतर वेळणेश्वर परिसरात मोठी खळबळ उडाली. याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं. घटनेचं गांभीर्य ओळखू वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने रत्नागिरीच्या बॉम्ब शोध नाथक पथकाला याबाबतची माहिती देण्यात आली.

(भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षावर CBI ची छापेमारी; काही तासात अधिकारीच पोहोचला तुरुंगात!)

संबंधित स्फोटकाची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरीच्या बॉम्ब शोध नाथक पथक घटनास्थळी दाखल झालं. या पथकाने तातडीने कामाला सुरुवात केली. या पथकाने प्रथमदर्शनी पाहणी केली असता संबंधित वस्तू स्फोटक असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर या पथकाने गांभीर्य ओळखत स्फोटकाला मोकळ्या जागेत नेलं. त्यानंतर तिथे संपूर्ण काळजी घेऊन मोकळ्या जागी स्फोटक निकामी करण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित स्फोटक हे हॅन्ड हेल्ड रॅकेट पॅराशूट होतं. या हॅन्ड हेल्ड रॅकेट पॅराशूटचा भरकटलेल्या जहाजांना इशारा देण्यासाठी वापर केला जातो. संबंधित घटना ही आज दुपारी घडली. स्फोटक हे बरणीमध्ये होते. पण नागरिकांनी बंद बरणीमधील वस्तूला हात न लावता तातडीने पोलिसांना फोन केला. त्यामुळे फोन करणाऱ्या नागरिकांचं पोलिसांनी यावेळी कौतुक केलं.

First published:

Tags: Explosives, Ratnagiri