जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ शिंदे घेणार उद्धव ठाकरेंची जागा की नवीन पद? नवी अपडेट्स समोर

एकनाथ शिंदे घेणार उद्धव ठाकरेंची जागा की नवीन पद? नवी अपडेट्स समोर

  पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटामध्ये उत्साह संचारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आता शिवसेना म्हणून नावा रुपास आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेत एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख होणार की आणि नवीन पद तयार केले जाणार, याबद्दल बैठक बोलावली आहे. पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड होणार आहे. तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याच्या तयारीत आहे. (‘हा माणूस महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, त्यामुळे..’ आता ‘सामना’मधून शहांवर निशाणा) राष्ट्रीय कार्यकारिणी ठरवण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. नवी राष्ट्रीय कार्यकारिणीही लवकरच जाहीर केली जाणार आहे. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी मुंबईत होणार आहे. या कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रमुखपदी निवड केली जाणार आहे. (…तेव्हा उद्धव ठाकरेंनीच शिंदेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं होतं, भुजबळांचा मोठा खुलासा) दरम्यान, विधिमंडळातल्या शिवसेनेच्या अधिकृत कार्यालयावरही शिंदेंचे आमदार दावा करणार आहे. आज शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवसेनेचं विधिमंडळातील अधिकृत कार्यालय एकनाथ शिंदे गटाला देण्याची मागणी केली जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात