Home /News /maharashtra /

भाजपात आलं की दुसरीकडं संसार करण्याची इच्छाच होत नाही; गिरीश महाजनांचा टोला, नवाब मलिकांवर टीकास्त्र

भाजपात आलं की दुसरीकडं संसार करण्याची इच्छाच होत नाही; गिरीश महाजनांचा टोला, नवाब मलिकांवर टीकास्त्र

भाजपत आलं की पुन्हा दुसरीकडे संसार (Ex minister Girish Mahajan criticizes Shivsena and NCP in Jalgaon) करण्याची इच्छा होत नाही, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.

जळगाव, 11 नोव्हेंबर: भाजपत आलं की पुन्हा दुसरीकडे संसार (Ex minister Girish Mahajan criticizes Shivsena and NCP in Jalgaon) करण्याची इच्छा होत नाही, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील (Shivsena wokers enters BJP) शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे (Girish Mahajan and Raksha Khadse) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमात महाजन बोलत होते. काय म्हणाले महाजन? एकदा भाजपात आलं की इतर कुठं संसार करायची इच्छाच होत नाही, असं टोला गिरीश महाजन यांनी लगावला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्थानिक पक्ष आहेत. शिवसेना आमच्यासोबत होती म्हणून त्यांचे 18 खासदार आणि 55 आमदार निवडून आले आहेत, असं महाजन म्हणाले. शिवसेनेला धक्का जळगाव जिल्ह्यातील चोपडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र तिथल्या शेकडो पदाधिऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गिरीश महाजनांनी पुढाकार घेत हा पक्षप्रवेश घडवून आणल्याचं मानलं जात आहे. हे वाचा- Maruti Celerio 2021 लॉन्च, 26KM चा मिळणार मायलेज; वाचा किंमत आणि फीचर्स नवाब मलिकांवर टीका नवाब मलिक हे पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते, मात्र इतका फुसका जर हायड्रोजन बॉम्ब असेल तर हायड्रोजन बॉम्बचे नाव बदलावे लागेल, असा टोला त्यांनी हाणला. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावप केलेले आरोप हे निव्वळ हवेत गोळीबार असून पुराव्याचा एक तरी कागद नवाब मलिक यांनी दाखवावा, असं आव्हान त्यांनी दिलं. केवळ आपल्या स्वार्थासाठी नवाब मलिक निरर्थक आरोप करत असून आर्यन खान किती चांगला व हर्बल तंबाखू किती छान हे सांगण्यापेक्षा नवाब मलिक यांनी आता जनतेकडे लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published by:desk news
First published:

Tags: Nawab malik, NCP, Shivseana

पुढील बातम्या