Home /News /auto-and-tech /

Maruti Celerio 2021 लॉन्च, 26KM चा मिळणार मायलेज; वाचा किंमत आणि फीचर्स

Maruti Celerio 2021 लॉन्च, 26KM चा मिळणार मायलेज; वाचा किंमत आणि फीचर्स

maruti suzuki Celerio दोन फ्रंट एअर बॅग, ABS आणि रिव्हर्सिंग सेन्सरसह कन्सोल पॅनलवर कॅमेरा दिलेला आहे. मनोरंजनासाठी, कार Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने आपली बहुप्रतिक्षित हॅचबॅक Celerio 2021 लॉन्च केली आहे. कंपनीने गाडीची किंमत 4.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ते 6.94 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत ठेवली. फ्युएल एफिशियंट कार Celerio 2021 नवीन 7-इंच टचस्क्रीन कन्सोल, स्टार्ट आणि स्टॉपसाठी पुश बटणे, ऑटो इंजिन स्टार्ट/स्टॉप, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील यासारख्या अनेक फीचर्ससह तरुण खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी सुसज्ज आहे. मारुती सुझुकी सेलेरियो 2021 फायर रेड आणि स्पीडी ब्लू कलर पर्यायामध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की ही फ्युएल एफिशियंट कार (Fuel efficient car) आहे. ही कार 26.68 kmpl मायलेज देईल असं कंपनीचा दावा आहे. Driving License हरवलं? घरबसल्या असं बनवा डुप्लीकेट; पाहा संपूर्ण प्रोसेस Celerio 2021 ला क्रोम बारसह एक नवीन मेटल जाळी मिळते. इंटिरिअर्स ऑल-ब्लॅक थीममध्ये येतं. संपूर्ण केबिनमध्ये फॉक्स अॅल्युमिनियम एक्सेंट्स, व्हर्टिकल एसी व्हेंट्ससहं येतं Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट सुरक्षेच्या दृष्टीने, Celerio दोन फ्रंट एअर बॅग, ABS आणि रिव्हर्सिंग सेन्सरसह कन्सोल पॅनलवर कॅमेरा दिलेला आहे. मनोरंजनासाठी, कार Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. Maruti Suzuki Celerio 2021 मध्ये 1.0-लिटर तीन-सिलेंडर K10c पेट्रोल इंजिन आहे. ट्रान्समिशन ऑप्शन, 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5 स्पीड AMT. आयडल स्टार्ट-स्टॉप टेक्नॉलॉजीसह ड्युअल जेट, ड्युअल VVT K-सिरीज इंजिन 3500rpm वर 89Nm टॉर्क आणि 6000rpm वर 50kW पॉवर जनरेट करते. फ्री Wifi वापरताना अशी घ्या काळजी; चोरी होऊ शकतो पर्सनल डेटा 11,000 रुपयांच्या टोकन मनीवर कार बूक करा मारुती सुझुकी सेलेरियोला मारुती सुझुकी एरिनाच्या www.marutisuzuki.com/celerio अधिकृत वेबसाइटवर किंवा मारुती सुझुकी डीलरशिपद्वारे फक्त 11,000 रुपयांचे टोकन मनी देऊन बुक केले जाऊ शकते. मारुती सुझुकी सेलेरियो 2021 चे बुकिंग एक आठवडा अगोदर सुरु करण्यात आले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Auto expo, Maruti suzuki cars

    पुढील बातम्या