जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'रोज मंदिराचा मुद्दा काढणे योग्य नाही' ज्ञानवापी वादावर मोहन भागवत यांचे परखड मत

'रोज मंदिराचा मुद्दा काढणे योग्य नाही' ज्ञानवापी वादावर मोहन भागवत यांचे परखड मत

हिंदू हे मुसलमानाच्या विरोधात नाही. रोज मंदिरांचा मुद्दा काढणे योग्य नाही,

हिंदू हे मुसलमानाच्या विरोधात नाही. रोज मंदिरांचा मुद्दा काढणे योग्य नाही,

हिंदू हे मुसलमानाच्या विरोधात नाही. रोज मंदिरांचा मुद्दा काढणे योग्य नाही,

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 02 जून : वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Mosque) शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. पण, पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ‘हिंदू हे मुसलमानाच्या विरोधात नाही. रोज मंदिराचा मुद्दा काढणे योग्य नाही’ अस परखड मत मोहन भागवत (mohan bhagvat) यांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘संघ शिक्षा वर्ग - तृतीय वर्ष’ वर्गाचा आज समारोप रेशीमबाग मैदानावर पार पडला.  यावेळी  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. ‘ज्ञानवापीचा इतिहास आहे. आपण त्याला बदलू शकत नाही. काही मुस्लिम आक्रमनकारी आले आणि त्यांनी मंदिरं तोडली. त्यामुळे हिंदू ना वाटते तेथे मंदिर व्हायला पाहिजे. मात्र हिंदू हे मुसलमानाच्या विरोधात नाही. रोज मंदिरांचा मुद्दा काढणे योग्य नाही, असं परखड मत भागवत यांनी व्यक्त केलं. तसचं, विपरीत परिस्थितीमध्ये राम मंदिर आंदोलनात सहभागी झालो होतो. आता आम्हाला कोणते आंदोलन करायचे नाही, असंही भागवत यांनी स्पष्ट केलं. ( IPL 2023 आधी गुजरात 5 खेळाडूंना देणार डच्चू! वर्ल्ड चॅम्पियनवरही टांगती तलवार ) कोरोनाच्या काळात आमच्या स्वयंसेवकांनी कोरोनाबाधितांची सेवा केली. राम जन्मभूमीसाठी निधी गोळा करण्यासाठी स्वयंसेवकांचे मोठे योगदान आहे. सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जात आहोत. पूर्वी ही भूमी सुरक्षित होती,  समृद्धी होती. ( लग्नातून महिलेचं अपहरण, 9 जणांकडून रेप, 4 लाखांमध्ये विक्री; पती मात्र घरात शांत ) रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं. रशियाच्या या कृत्याचा विरोध होत आहे. कुणीही युक्रेनला जाऊन रशियाला थांबवत नाही. या युद्धात भारताची भूमिका ही तटस्थ आहे आणि तीच असली पाहिजे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आपल्याला शिकवलं की देश हा शक्ती संपन्न असला पाहिजे, नीती आणि शक्ती दोन्ही असल्या पाहिजे. भारताला विश्वगुरू बनवण्याची वेळ आली आहे, असंही मोहन भागवत म्हणाले. ‘इतिहास कुणीही बदलू शकत नाही. आता संघाला कोणतेही आंदोलन नको आहेत. आम्ही एकच आंदोलन केले होते जे 9 नोव्हेरला राम मंदिरासाठी होतं. रोज एकच मुद्या काढणे योग्य नाही. प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग का निघत आहे. आपले पूर्वज हे समान आहे. शत्रू-मित्र भाव आपल्यासाठी समान आहे.  मुस्लिमांनीही भारताला आपली मातृभूमी समजावी. माझंच योग्य हा अहंकार योग्य नाही. एक दुसऱ्याच्या भावनाचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हिंदू संवेदना ठेवतो, हिंदू समाज हा कधीच कोणताही वाद मान्य करणार नाही, आम्ही सुद्धा आक्षेप घेणारे आहोत, असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात