जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लग्नातून महिलेचं अपहरण, 9 जणांकडून रेप, 4 लाखांमध्ये विक्री; पती मात्र घरात शांत बसून

लग्नातून महिलेचं अपहरण, 9 जणांकडून रेप, 4 लाखांमध्ये विक्री; पती मात्र घरात शांत बसून

लग्नातून महिलेचं अपहरण, 9 जणांकडून रेप, 4 लाखांमध्ये विक्री; पती मात्र घरात शांत बसून

पत्नी बेपत्ता झाल्यानंतरही पतीने पोलिसात तक्रार दाखल केली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 2 जून : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मुरैनामध्ये (Morena) एका विवाहित महिलेसह सामूहिक बलात्काराचा  (Gangrape) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 4 जणांनी लग्न समारंभादरम्यान महिलेचं अपहरण केल्याचा आरोप आहे. यानंतर तिच्यासोबत 9 जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर समोर आलं की, महिलेचं लग्न देखील एक सौदा होता. पोलिसांनी आता पीडितेच्या पतीविरोधात कारवाई करण्याची तयारी केली आहे. मुरैनाचे सिव्हील लाइन पोलीस ठाणे हद्दीत राहणारी 24 वर्षीय महिलेने सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने सांगितलं की, 18 फेब्रुवारी रोजी ती एका लग्नात गेली होती. लग्न समारंभात 4 जणांनी तिचं अपहरण केलं. यानंतर 9 जणांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला. पीडितेचा आरोप आहे की, बलात्कारा नंतर तिला भिंडमध्ये 4 लाखात मजुरी करण्यासाठी विकण्यात आलं. पीडित महिलेने 25 मे रोजी आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि पोलिसांकडे गेली. यानंतर पोलिसांनी दोषींविरोधात बलात्कार आणि मानवी तस्करीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपू गुर्जर, वीरेंद्र गुर्जर, प्रताप गुर्जर, गजेंद्र गुर्जर आणि जीतू गुर्जर लहर गावातील निवासी आहेत. आरोपी पंकज गुर्जर, सुनील गुर्जर आणि पप्पू खटीक कटमा गावातील रहिवासी आहेत. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी फरार आहे. पतीचं कृत्य आलं समोर… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला 18 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. मात्र तिच्या पतीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. यानंतर जेव्हा तिच्या पतीची चौकशी केली, त्यावेळी तो इथल्या-तिथल्या गोष्टींबद्दल बोलू लागला. महिलेने सांगितलं की, 12 व्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. यानंतर दीपूच्या कुटुंबीयांनी तिची काळजी घेतली. यानंतर करार करीत तिचं लग्न लावून देण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात