जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आधी हालचाल जाणवली अन् मग क्षणार्धात राहातं घर 70 फूट जमिनीत गेलं, चंद्रपूरमधील घटनेचा Live Video

आधी हालचाल जाणवली अन् मग क्षणार्धात राहातं घर 70 फूट जमिनीत गेलं, चंद्रपूरमधील घटनेचा Live Video

आधी हालचाल जाणवली अन् मग क्षणार्धात राहातं घर 70 फूट जमिनीत गेलं, चंद्रपूरमधील घटनेचा Live Video

घटनेत गावात अचानक एक निवासी घर जमिनीत गडप झालं. 70 फूट जमिनीत संपूर्ण घरच गडप झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

  • -MIN READ Chandrapur,Maharashtra
  • Last Updated :

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर 27 ऑगस्ट : जिल्ह्यातील घुग्गूस गावातील थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेत गावात अचानक एक निवासी घर जमिनीत गडप झालं. 70 फूट जमिनीत संपूर्ण घरच गडप झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गावातल्या आमराई वार्डात आजूबाजूला कोळसा खाणी आहेत तसंच वर्धा नदीचं पात्र आहे. याच भौगोलिक परिस्थितीमुळे भूमिगत कोळसा खाणीतील पोकळी आणि महापुराचे पाणी झिरपल्याने अशा पद्धतीने घर गडप झाल्याची घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

सर्जा खाली उतर, पण ‘तो’ थेट छतावरून खाली कोसळला, पोळ्याची दिवशी दुर्दैवी घटना, जळगावातला LIVE VIDEO या घटनेनंतर सध्या या भागातील पन्नासहून अधिक घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविलं आहे. वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणा सध्या कामाला लागले आहेत. या घटनेनंतर भूगर्भ अभ्यासक आणि कोळसा खाणीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून प्रत्यक्ष स्थितीचा अभ्यास करणार आहेत.

जाहिरात

गजानन मडावी यांचं हे घर असून घर अचानक हलू लागल्याने घाबरून घरातील सदस्य बाहेर पडले होते. यानंतर काही क्षणातच अख्खं घर 70 फूट जमिनीत गडप झालं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तिथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने घर 70 फूट जमिनीत गडप होण्याची ही पहिलीच घटना उजेडात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. या घटनेमुळं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात