मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एकुलता एक मुलगा जीवावर उठला; पित्यावर कुऱ्हाडीने केले सपासप वार, धक्कादायक कारण आलं समोर

एकुलता एक मुलगा जीवावर उठला; पित्यावर कुऱ्हाडीने केले सपासप वार, धक्कादायक कारण आलं समोर

Murder in Buldhana: वडिलांचा कोणता शब्द मुलाच्या जिव्हारी लागेल सांगता येत नाही. बुलडाण्यात एकुलत्या एक मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या पित्याला संपवलं आहे.

Murder in Buldhana: वडिलांचा कोणता शब्द मुलाच्या जिव्हारी लागेल सांगता येत नाही. बुलडाण्यात एकुलत्या एक मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या पित्याला संपवलं आहे.

Murder in Buldhana: वडिलांचा कोणता शब्द मुलाच्या जिव्हारी लागेल सांगता येत नाही. बुलडाण्यात एकुलत्या एक मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या पित्याला संपवलं आहे.

बुलडाणा, 31 मे: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (Corona pandemic) सध्या देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. परिणामी शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ मोबाइल वापरण्यात आणि सोशल मीडिया (Social media) स्क्रोल करण्यात जात आहे. अशाच एका मोबाइलच्या आहारी गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष दे! म्हणणं एका पित्याच्या जीवावर बेतलं आहे. संबंधित अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आपल्या पित्यावर कुऱ्हाडीने सपासप वार (stabbed with axe) करत त्यांची हत्या (engineering student killed father) केली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित हत्या झालेल्या 55 वर्षीय वडिलांचं नाव गंजानन संपत गवई असून ते बुलडाणा शहरातील समतानगर परिसरात राहतात. मृत गवई यांचा 21 वर्षीय मुलगा शुभम अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याला मोबाइल आणि सोशल मीडियाचं प्रचंड व्यसन होतं. त्याला आई वडिलांनी अभ्यास कर, मोबाइल कमी बघ, असं म्हटलं की तो चिडचिड करायचा. यातूनच त्याने त्याने वडील गजानन गवई यांचा धारदार कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा-शाळेतील मुलींशी फेसबुकवरुन करायचा चॅटिंग; मग जाळ्यात ओढून आयुष्य करायचा उद्धवस्त

हल्ला झाल्यानंतर गवई यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण रक्तप्रवाह वाया गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत गवई हे अमडापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते आपली पत्नी आणि मुलगा शुभमसह एकत्र राहात होते. मृत गवई यांचा शुभम हा एकुलता एक मुलगा होता. त्यांना अन्य चार मुली असून त्या विवाहित आहेत.

हे ही वाचा-साखरपुड्यानंतर प्रियकराकडून लग्नास नकार; पुण्यातील तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

तर आरोपी मुलगा शुभम हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील काही काळापासून आरोपी शुभमवर मानसिक उपचार केले जात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा शुभमला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Buldhana news, Father, Murder