नांदेड, 22 सप्टेंबर : नांदेडमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता कदम असे मयत तरुणीचे नाव आहे. ती उस्मानाबादची रहिवाशी होती. नांदेडच्या श्री गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई यांत्रिकी शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत होती. गीता कदम ही दोन दिवसांपासून बेपत्ता होती. 21 सप्टेंबर रोजी गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहामधील एका खोलीत रात्री 11 वाजेच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंख्याला दोरी लावून तिने गळफास घेतला होता. त्यानंतर वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. घटनास्थळावर एक सुसाईट नोट आढळली आहे. (अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलाने आईचा बेल्टने आवळला गळा, प्रेयसीनेही केली मदत) वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून गीताने आत्महत्या केल्याची सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या प्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. बुधवारपासून गायब असलेल्या या तरुणीने हॉस्टेलच्या एका खोलीत जाऊन ही आत्महत्या केल्याची माहिती प्राचार्यानी दिली. दरम्यान, मयत तरुणीने महिला आयोगाच्या नावाने सुसाईड नोट लिहिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. औरंगाबादेत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या दरम्यान, औरंगाबाद शहरामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. अनिल आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम श्रेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल माधवराव आग्रहारकर (वय 55) यांनी उल्कानगरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण घेतल्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी 8.30 वाजले तरी ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे खोलीत डोकावून पाहिले असता आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.