भिवंडी, 22 सप्टेंबर : भिवंडीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलाने आपल्या आईचा बेल्टाने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील मैत्रीपार्क बिल्डिंगमध्ये ही घटना घडली आहे. या इमारतीमध्ये अमरावती अंबिकादास यादव (वय 58 वर्ष) यांचा मुलगा कृष्णा अंबिकाप्रसाद यादव याच्यासोबत राहत होत्या. याच इमारतीत मुलगा कृष्णा यादव आणि बबिता पलटूराम यादव यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती आई अमरावती हिला समजली असताना त्यांनी तीव्र विरोध केला. त्यांनी मुलगा कृष्णाची समजूत काढली. पण तो आईचे ऐकण्यास तयार नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद होत होता. (पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, गोंदियातील विवाहित तरुणासोबत भयानक कृत्य) बुधवारी रात्री पुन्हा एकदा कृष्णा आणि त्याच्या आईमध्ये वाद पेटला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, त्यामुळे त्याचा राग आल्याने त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन मुलगा कृष्णा आणि बबिता या दोघांनी संगनमत करून बेल्टने आई अमरावती यांचा गळा आवळून हत्या केली. अमरावती यांची हत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. (शारीरिक संबंधांना तरुणीचा नकार, नाशिकमधील पीडितेचे अश्लिल फोटो व्हायरल करून विनयभंग) या घटनेची माहिती जगदीश यादव यांना मिळाली असताना त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात कृष्णा आणि बबिता या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. जगदीश यादव यांच्या तक्रारीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येच्या गुन्ह्या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.